शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

एक लाख गरिबांना मिळणार  स्वप्नामधील हक्काचं घर 

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: June 7, 2023 09:44 IST

‘शबरी आदिवासी’ योजनेंतर्गत राज्याने निश्चित केले १,०७,०९९ घरांचे उद्दिष्ट

यशवंत परांडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आदिवासी उपाययोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये  किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय २ जून २०२३ रोजी शासनाने घेतला आहे. यासंदर्भात लवकर अंमलबजावणी करण्याची सूचनाही राज्य शासनाने केली आहे. 

पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील  जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण १ लाख ७ हजार ९९ उद्दिष्ट/लक्ष्यांक निश्चित  करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.    

घरासाठी या आहेत अटी... 

- ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.२० लक्ष आहे, अशा लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. 

-२८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमाबरोबर आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा. 

- या योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून, दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.

राज्यात असे दिले घरांचे उद्दिष्ट...

नाशिक : कळवण      ३०००नाशिक    ५०००जळगाव : यावल     ५०००नंदुरबार : तळोदा     १२०००धुळे      ५७०९  अहमदनगर : राजूर     २००० ठाणे : शहापूर     २००० पालघर : डहाणू     १२७५ जव्हार     २९४७ रायगड     २६३९ रत्नागिरी     ०२ पुणे     १८६४ कोल्हापूर : घोडेगाव    १० सातारा     १० सोलापूर     १०० नांदेड : किनवट     ३००० हिंगोली : कळमनुरी     ५००० परभणी      १०००छत्रपती संभाजीनगर     ३९३६धाराशिव     १२५जालना     १७९४लातूर      ६३६बीड     ११७९ अमरावती : धारणी     ७९०६ अकोला      ६०० बुलढाणा     १५०० वाशिम     ७०० यवतमाळ : पांढरकवडा      ४०००पुसद     ५०० नागपूर      ५००० वर्धा      ५०० गोंदिया : देवरी     १५०० भंडारा      १२२६ चंद्रपूर : चंद्रपूर     ७५००चिमूर     ११६६ गडचिरोली : गडचिरोली     २०००अहेरी     ४५०भामरागड     ३२५

 

टॅग्स :Hingoliहिंगोली