शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारातून वृद्धेची २० हजार रुपये रोख असलेली पिशवी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:06 IST

अचानक अंगाला खाज आल्याने वृद्ध महिला उपचारासाठी दवाखान्यात गेली होती

आखाडा बाळापूर  ( हिंगोली ) : आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या 71 वर्षीय वृद्धेची पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली आहे. पिशवीत रोख 20 हजार रुपये, पासबुक, एटीएम कार्ड, आधारकार्ड अशी कागदपत्रे होती. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील 71 वर्षीय महिला केसरबाई नानाराव पडघनकर या दिनांक 11 जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथे आठवडी बाजारात आल्या होत्या. दुपारी 4:00 वाजण्याच्या सुमारास बाजार करत असताना अचानक त्यांच्या अंगाला खाज आली. यामुळे त्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोरील धनश्री दवाखान्यात उपचारासाठी गेल्या. उपचार घेत असताना हातातली पिशवी त्यांनी बाजूला ठेवली. हीच संधी साधत चोरट्यांनी पिशवी पळवली. पिशवीत वीस हजार रुपये रोख,पासबुक ,एटीएम कार्ड ,आधारकार्ड व इतर कागदपत्रे होती. केसरबाई पडघनकर यांच्या फिर्यादीवरून बाळापुर पोलीस ठाण्यात 12 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार नागोराव बाभळे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजारात चोरटे सक्रिय झाले आहेत. 

चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात बाळापूर पोलिसांना अपयश आले आहे .चोरी गेलेल्या वस्तूंची तक्रारही नोंदवल्या जात नसल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. बाजारात मोबाईल चोरीला गेला की तो हरवला आहे, अशी नोंद ठाण्यात केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. बाळापुर ही मोठी व्यापारपेठ असून पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने चोरटे सक्रीय झाले आहेत. 

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी