शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कृषी सहसंचालकांनी अधिकाऱ्यांना झापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:11 IST

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी अंकुश डुब्बल, उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, उपसंचालक लाडके, लोंढे आदींची उपस्थिती होती. कापसावरील बोंडअळी व सोयाबीनवर अळीचा होत असलेला प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती घेतली.यावेळी अनेक कृषी सहायकांनी दिलेली माहिती व प्रत्यक्ष विचारणा केल्यानंतर सांगितलेल्या बाबींमध्ये मोठी तफावत आढळून येत होती. त्यामुळे जगपात यांनी प्रत्यक्ष भेटी न देताच असे बोगस कामे करीत असाल तर असेच होईल. निरीक्षणाखालील प्लॉटची माहिती नसण्याचे काय कारण असा सवाल केला. त्याचबरोबर गावाची नावेही अहवालात चुकल्याचे समोर आले. ही बाब जुजबी असली तरीही शेतकºयांपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे. निरीक्षणाखाली असलेल्या प्लॉटच्या शेतमालकाला महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून ५0 टक्के अनुदानावर औषधी देण्यात येत आहे. तिचे वाटप न करता केवळ भाषणे केली अन् फोटो काढल्याचे दिसत असल्याचे म्हणाले. तर जेथे धोक्याच्या पातळीच्या पुढे बोंडअळी पडली तेथे थेट डीबीटी करून खरेदी करा. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करून खरेच वापर झाला की नाही, याची खातरजमा करा. अन्यथा दाखवायचे म्हणून व अनुदान उचलायचे म्हणून हे काम होता कामा नये, अशी तंबीही दिली. अन्यथा पावत्या एवढ्या जमतील की, कापसाचे उत्पादनही तेवढे होणार नाही.या बैठकीसाठी अनेक कृषी सहायक व अधिकारी गैरहजर होते. त्यासाठी कुणी परवानगी दिली होती? असा सवाल करून माझ्या बैठकीला गैरहजर राहायचे तर मीच परवानगी देऊ शकतो. इतरांना काहीच अधिकार नाही. जे गैरहजर आहेत, त्यांचे एक दिवसाचे वेतन कापून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले.बोलतीच बंद : माहिती सांगता येईनाकृषी सहसंचालकांच्या अनुभवी व टोकदार प्रश्नांनी कृषी सहायकच नव्हे, तर अधिकारीही घायाळ होत होते. प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन कामच करायचे हे माहिती नसल्याने अनेकांची तर बोलतीच बंद होत होती. ज्यांनी थोडीफार का हाईना भेटींतून परिस्थिती जाणून घेतली, अशांचेच काय ते ऐकून घेतले जात होते.यामुळे अनेकांची बोबडी वळत असल्याचे चित्र होते. सुरुवातीला खुली असलेली ही बैठक नंतर माध्यमांचे प्रतिनिधी आल्याचे लक्षात येताच गोपनियतेकडे वळली. मात्र तरीही कृषी सहसंचालकांनी अनेक बाबींची चिरफाड केलीच.हिंगोली हा लहान जिल्हा आहे. त्यामुळे येथे चांगले काम करण्यास चांगलाच वाव आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी ही बाब डोळ्यासमोर ठेवून सुधारणा करावी, असा सल्लाही जगताप यांनी दिला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती