शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकारी कार्यालय ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:15 IST

येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी अधिकृतपणे कार्यरत नसल्याने कार्यालय ओस पडले असून तालुका शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. या प्रकाराकडे जिल्हा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी अधिकृतपणे कार्यरत नसल्याने कार्यालय ओस पडले असून तालुका शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. या प्रकाराकडे जिल्हा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.येथील पंचायत समिती कार्यालयातील तालुकास्तरीय शिक्षण विभागाचे कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने पद स्थापनाच मंजूर केली नाही. मागील २0 वर्षांपासून शिक्षण विभागाचा कारभार कारकुनी कर्मचाऱ्यांविना चालू आहे. शिक्षण विभागातत एक गटशिक्षणाधिकारी व दोन विस्तार अधिकाºयांची पदे मंजूर आहेत. पंरतु वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. एक विस्तार अधिकाºयांचे पद रिक्त असून कार्यरत विस्तार अधिकाºयांकडेच गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार दिला होतो. त्यातच तालुक्याीतल कापडसिंगी येथील प्रकरण घडले अन् प्रभारी अधिकाºयावरही गुन्हा दाखल झाला. या परिस्थितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप हे रजेवर गेले. त्यामुळे या कार्यालयात एकही अधिकृत अधिकारी, कर्मचारी उरला नाही. तालुक्यात कार्यरत साधनव्यक्ती, अपंग शिक्षक यांच्या वतीने किरकोळ कामकाजाचा निपटारा केला जात असल्याने महत्त्वाचे कार्यलयीन कामकाज मात्र ठप्प पडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. शिक्षण विभागाच्या कार्यालयात कायम कुणीही दिसत नसून खुर्च्या, टेबल अधिकारी-कर्मचाºयांचा प्रतीक्षेत रिकामे आहेत. या सर्वांचा परिणाम तालुक्यातील शाळांच्या विकासावर होत आहे. तालुका स्तरावरून ग्रामीण भागातील शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी कार्यरत नाही.शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाचा विषयासंबंधी प्रशासनाचा बेफिकीर वृत्तीने तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी, नवीन पदे मंजुरीसाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र पंचायत समितीसर्व विकास कामांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा असताना तेथे सुधारणा घडवू न शकलेल्या लोकप्रतिनिधींना शिक्षण विभागाचा पुळका येणे शक्यच नाही. केवळ मिरविण्यापुरतीच पुढारी मंडळी उरली असल्याने तालुक्यातील समस्यांमध्ये भर पडत आहे.आपोआप होणाºया कामाचे श्रेय घेण्यासाठी शंभर डोकी तयार असतात. मात्र खºया प्रश्नांमध्ये लक्ष न दिल्याने अक्षरश: बोगस शाळा चालविणारे उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यातून संबंधितांची दुकानदारी होत असली तरीही पिढ्यान् पिढ्या बरबाद होत आहेत, हे पुढाºयांनी लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक