शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये विनापासिंगच्या वाहनांची संख्या वाढली, 'आरटीओ'चे होत आहे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:06 IST

विनाक्रमांक व विनापासिंगच्या वाहनांवर कारवाई करण्यास आरटीओ किंवा वाहतूक शाखा धजावत नाही.

वसमत (हिंगोली ) : विनाक्रमांक व विनापासिंगच्या वाहनांवर कारवाई करण्यास आरटीओ किंवा वाहतूक शाखा धजावत नाही. शासनाचा महसूल, वाढवण्यासाठी असलेल्या आरटीओ खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ‘अघोषित करारा’नेच टिप्पर, ट्रकसारखी वाहनेही राष्ट्रीय महामार्गावर विनापासिंगची धावण्याची हिम्मत करत असल्याचे चित्र आहे. 

वाहनांची पासिंग करावी लागते, वाहनांवर आरटीओने दिलेला नोंदणी क्रमांक टाकायचा असतो. नसता आरटीओच्या ताब्यात वाहन गेले की, पुन्हा भरपूर दंड भरल्याशिवाय सुटत नाही, अशी कधीकाळी वाहनधारकांमध्ये असलेली भीतीच आता नाहिशी झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विना पासिंगच्या वाहनांवर कारवाई होणार नाही, असा संदेश जारी केल्यासारखे वातावरण सध्या वसमत तालुक्यात पहावयास मिळत आहे. प्रचंड महाकाय टिप्पर, ट्रक, मालवाहू वाहने, टेंम्पो, ट्रॅक्टर, मिनी ट्रक या सारखे अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड संख्येने विनापासिंगची धावत असल्याचे चित्र आता सवयीचे झाले आहे.

वसमत - औंढा रस्त्यावर होणाऱ्या रस्ता बांधकामावर शेकडोच्या संख्येने विनाक्रमांकाची वाहने गौण खनिज घेवून ये-जा करत असताना दिसते. परप्रांतातून आलेल्या वाहनांचीही संख्या लक्षणीय आहे. वसमत तालुक्यात तर ९० टक्के ट्रॅक्टर ट्रॉलीला पासिंगच नाहीत. एवढ्या प्रचंड संख्येने विनापासिंग वाहने असलेला तालुका म्हणून वसमत तालुका आता नावा रूपाला येत आहे. विनापासिंग वाहनांमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल तर बुडतच आहे भरीसभर अशी विनानोंदणीची वाहने राष्ट्रीय महामार्गावर धावत असल्याने अपघाताच्या संख्येतही भर पडत आहे. ज्यांना वाहनांची पासिंग करावी लागते हे माहीत नाही, अशा वाहनधारक व चालकांना वाहतुकीचे नियम तरी माहिती असतील का? हा यक्षप्रश्न आहे. 

धुडगूस वाढला  वसमत तालुक्यात विनापासिंग वाहने बाळगण्याची वाढलेली हिंमत ही आरटीओ अधिकाऱ्यांच्या पूर्ण मूकसंमतीचाच प्रकार असल्याची चर्चा आता होत आहे. औंढा- वसमत रस्त्यावर विनानोंदणीच्या व परप्रांतातील वाहनांची अचानक वाढलेल्या संख्येला तर आरटीओंची हिरवी झेंडी असल्याचे उघड चर्चा आहे. या रस्त्याच्या कामांवर विनाक्रमांकाच्या वाहनासंदर्भात एका मध्यस्थाने कारवाई होणार नसल्याची हमी घेतल्याचीही चर्चा आहे. आजवर आरटीओंची न झालेली कारवाई व जड वाहनांचा मुक्त धुडगूस त्या चर्चेला बळकटी देत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसHingoliहिंगोलीfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलर