शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता सभा ठरली तरीही अडचण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:40 IST

हिंगोली : येथील नगरपालिकेत सभापती निवडीच्या सभेवरून आधी संभ्रमावस्था होती. आता ती घेण्याची तारीख निश्चित झाली तर मुुस्लिम नगरसेवक औरंगाबाद येथे होणा-या भव्य इज्तेमाच्या कार्यक्रमाला गेल्याने ते न.प.सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सभा लांबणीवर टाकण्याची मागणी होत असून, प्रशासनाची नोटीस न मिळाल्याने ती करताही येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगरपालिकेत सभापती निवडीच्या सभेवरून आधी संभ्रमावस्था होती. आता ती घेण्याची तारीख निश्चित झाली तर मुुस्लिम नगरसेवक औरंगाबाद येथे होणा-या भव्य इज्तेमाच्या कार्यक्रमाला गेल्याने ते न.प.सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सभा लांबणीवर टाकण्याची मागणी होत असून, प्रशासनाची नोटीस न मिळाल्याने ती करताही येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.हिंगोली पालिकेत सभापती निवडीचा मुद्दा अंतर्गत वादातून समोर आला. मात्र ही निवड प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण न झाल्याने त्यात राजकीय दबावाचा आरोप झाला. आता या प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकाºयांनी २६ फेब्रुवारी ही तारीख काढल्यानंतर नगरसेवक मंडळींची ओरड सुरू झाली. एकतर अद्याप याची न.प.त अथवा नगरसेवकांनाच माहिती नाही. आमच्या पक्षाचे दोन नगरसेवक असून त्यांना अजून सभेबाबत माहिती नसल्याचे मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांनी सांगितले. तर या प्रक्रियेच्या गोंधळाला कुणी जबाबदार आहे की नाही? चाकोरी मोडली गेल्यास त्याच्यावर कुणाचे नियंत्रण? असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक म्हणाले, या सभेला आधीच विलंब झालेला आहे. आता सभा ठरली तरीही मुस्लिम बांधवांचा पवित्र इज्तेमा औरंगाबादला असल्याने या समाजाच्या जवळपास नगरसेवक/ नगरसेविका तिकडे गेल्याने उपस्थितीची समस्या आहे. त्यामुळे ही सभा लांबविण्याची गरज आहे. मात्र न.प.त या सभेबाबतच काही माहिती नसल्यामुळे तशी मागणीही करता येत नसल्याचे ते म्हणाले. तर नगरसेवक माबुद बागवान व आरेफ लाला यांनीही इज्तेमाच्या कार्यक्रमासाठी नगरसेवक जात असल्याने न.प.ची सभापती निवडीची सभा लांबली पाहिजे, अशी मागणी केली.दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सभा लांबविण्यास कुणाचीही लेखी मागणी आली नसल्याचे सांगितले. तर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार २६ रोजी १२ वा. सभा सुरू होणार असून अर्ज १0 ते १२ या वेळेत भरावे लागतील. मात्र महाराष्ट्र न.प., न.पं. नियम २00६ नियम २ (३) अन्वये आलेली बैठक रद्द किंवा तहकूब करता येणार नसल्याची टिपही त्यात टाकण्यात आलेली आहे.हिंगोली नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा २७ फेब्रुवारी रोजी आहे. या सभेची नोटीस नगरसेवकांना मिळाली आहे. मात्र यात सोबतचे जोडपत्रच दिले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमके काय राहणार आहे, याचा काहीच मेळ नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे या अर्थसंकल्पाचा अभ्यास कधी करायचा? असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.