शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौठा गटात येणार आता महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतमध्ये आता सरपंचपद हे महिलांसाठी राखीव सुटल्याने या भागात जास्तीत ...

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतमध्ये आता सरपंचपद हे महिलांसाठी राखीव सुटल्याने या भागात जास्तीत जास्त प्रमाणात महिलाच सरपंच होणार आहेत.

या गटात आता मात्र महिलाराज येणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले. दीड वर्षानंतर दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कौठा गावासाठी ओबीसी महिला, किन्होळा गाव ओबीसी महिला, दगडगाव ओबीसी महिला, मोहगाव ओबीसी महिला, खुदनापुर गाव खुला प्रवर्ग महिला,धामणगाव महिला,सोमठाना खुला प्रवर्ग महिला, महमदपूर वाडी महिला इत्यादी गावात महिलाच सरपंच होणार आहेत. त्यामुळे गावचे पुढारी होण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या पुरुष मंडळींना आता मात्र पडद्या मागूनच काम करावे लागणार आहे.

वसमत तालुक्याच्या राजकारणात नेहमीच मोलाची भूमिका बजाववणारे कौठा जिल्हा परिषद गट आहे. या गटात हिंगोली जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय मंडळी कार्यरत आहेत. आता या गटात एकूण बारा ग्रामपंचायत पैकी आठ गावातील गावकारभारी या महिला होणार आहेत. सद्य:स्थितीत कौठा जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व कौठा पंचायत समिती गणाच्या सदस्या ही महिलाच आहेत. त्यामुळे या भागात महिला राज येणार असून महिलांचे वर्चस्व राहणार आहे.