शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आता नरकयातना असह्य झाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.कळमनुरी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवाडी येथील रस्त्याचा व गावातील सुविधांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. वारंवार निवेदने, आंदोलन व मोर्चे काढूनही या गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे १८ आॅगस्ट रोजी परत करवाडी येथील गावकºयांनी २५ किमी पायी चालत हिंगोली गाठली.सकाळी ९ वाजता निघालेले मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. लेकराबाळांसह, महिला, पुरूष व विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला होता. ही नित्याचीच बाब आहे. शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मानव विकास बसच माहित नाही. गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याने करवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची होणारी हेळसांड, तसेच गंभीर रूग्णाला बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी ऐनवेळी रस्त्याअभावी वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे किती दिवस ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी मोर्च्यादरम्यान उपस्थित केले. करवाडी गावाला रस्ता करून द्यावा, गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.न्याय : उच्च न्यायालयाने दखल घेतलीकळमनुरी तालुक्यातील करवाडी गावच्या रस्त्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सु-मुटो याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाकडूनही करवाडी रस्त्याबाबत खुलासा मागविला होता. परंतु याबाबत अद्याप जि. प. व जिल्हा प्रशासनाने कुठलीही कार्यवाहीकेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. परत शिनिवारी जिल्हाधिकाºयांना करवाडी येथील रस्ता व गावातील सुविधा याबाबत निवेदन सादर केले आहे. जि.प.लाही निवेदन सादर केले आहे, असे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी सांगितले.रस्त्याअभावी करवाडीत रूग्णवाहिका येत नाहीत. ना खाजगी वाहने येण्यास तयार होतात. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ रोजी गरोदर मातेला खाटेवर ३ किमी प्रवास करावा लागला. हा नेहमीचाच प्रक्रार असल्याचे गावकरी सांगत होते.पायी गाठली हिंगोली४रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी येथील आदिवासी समाजबांधव लहान-मुलांबाळासह करवारी ते हिंगोली पायी चालत आले. २५ किमी. अंतर पार करत मोर्चेकरी जिल्हा कचेरीसमोर जमले. यावेळी संघटनेतर्फेच मोर्चात सहभागी झालेल्यांना खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा