शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:26 IST

निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : निराधार योजनेची लाभ घेण्यासाठी काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे तपासात आढळून आल्याने १३ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.तालुक्यातील १३ जणांनी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१७-१८ या वर्षाचे खोटे व बनावटी उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून ते निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत तहसील कार्यालयात सादर केले. या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले आहे. निराधारांच्या प्रस्तावासोबत जोडलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची तपासणी नायब तहसीलदारामार्फत करण्यात आली असता ते खोटे व बनावटी असल्याचे आढळून आले. तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक व १३ जणांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक जुळून आला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निराधारांच्या संचिकेसोबत जोडण्यात आलेले बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणत्या व्यक्तीकडून तयार करून घेण्यात आले? कोणामार्फत काढले, याचा खुलासा सादर करण्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे बनावट व खोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणाविरूद्ध भारतीय दंड संहिता/८६० कलम ४१९, ४२०, ४६५४६८, ४७१, ४०९ व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट सन २००० चे कलम ४३ (१) ४६ (१) ६६ अन्वये गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा दोन दिवसांच्या आत सादर करण्यात यावा नसता आपणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही नोटिसीत नमूद आहे.१३ पैकी तिघांनी सादर केले खुलासेतहसीलदारांनी १३ जणांना ३ जानेवारी रोजी नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी तिघांनी खुलासे सादर केलेले आहेत. पार्वतीबाई मारोती गायकवाड, शांताबाई अवचार, तुळसाबाई केजगीर (तिघे रा. येडशी), किसन पाईकराव (शेनोडी), अनूसयाबाई चौतमल (रा.चाफनाथ), नर्मदाबाई असोले, तान्हुबाई असोले, वत्सलाबाई असोले (तिघे रा.असोलवाडी), शांताबाई चौतमल, बाबूराव चौतमल (रा. चाफनाथ), भगवान कांबळे, मंगलाबाई कांबळे (दोघे रा. खरवड) या १३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, उत्पन्नाचे खोटे व बनावट प्रमाणपत्र काढून देणारा कोण आहे, याची तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीSocialसामाजिक