शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

ना टेस्टिंग, ना लसीकरण ; तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

हिंगोली : गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण हे कासवगतीने सुरू आहे. रोज १० हजार डोसची गरज असताना, ५ हजार ...

हिंगोली : गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण हे कासवगतीने सुरू आहे. रोज १० हजार डोसची गरज असताना, ५ हजार डोसच मिळू लागले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील अँटिजन व आरटीपीसीआर तपासणीची गती मंदावलेली आहे.

१ एप्रिल रोजी रॅपिड अँटिजन तपासणी ७०७, १० एप्रिल रोजी ४२३, २० एप्रिल रोजी ९५९, ३० एप्रिल रोजी ३८७, तर ८ मे रोजी २६२ अँटीजन तपासण्या करण्यात आली. याबरोबर आरटीपीसीआर तपासणीही करण्यात आली. त्या तुलनेत मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत तपासणी होत नाहीत, असेच दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरणाच्या बाबतही कासवगती पहायला मिळत आहे. खरे पाहिले तर रोज दहा हजार लसींचे डोस देणे अगत्याचे असताना, पाच हजार लसींचे डोस नागरिकांना मिळत आहेत. मध्यंतरी तर २७ व २८ एप्रिल रोजी व त्यानंतर काही दिवस जिल्ह्यातील दोन- तीन केंद्रे वगळता शहरातील लसीकरण लसींअभावी बंदच होते. यावेळी ‘लस देता का लस’ असे नागरिकांची ओरड सुरू होती. आजमितीस जिल्ह्यात कोविशिल्डचे २५ हजार ६००, तर कोव्हॅक्सीनचे ८ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. नागरिकांचा डोस घेण्याबाबतचा उत्साह पाहता, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने लसीकरण केंद्र उघडले आहे. आता शहरात लसीकरणासाठी दोन केंद्रे उपलब्ध आहेत. हे सर्व पाहता, लसीकरणाची कासवगती संपुष्टात आणणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणे गरजेचे....

जिल्ह्यात सद्य स्थितीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही कोरोना बाधितामागे १८ आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणे गरजेचे आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही २५ ते ३० केली जाईल, असे सांगण्यात आले.

ग्रामीण भागात ज्येष्ठ मंडळींमध्ये उत्साह असला, तरी तरुणांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. अँटिजन व आरटीपीसीआर तपासणीनंतर काही बाधित रुग्ण मोकाटपणे फिरत आहेत. या मोकाट फिरणाऱ्या बाधितांना कुठेतरी आवर घालणे तितकेच महत्त्वाचे आहे.

पर जिल्ह्यातून किंवा परगावाहून आलेल्या व्यक्तींचे संबंधित केंद्रावर लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, लसीकरण न करताच काही लोक गावात प्रवेश करीत आहेत. शहरी भाग सोडला, तर ग्रामीण भागात मास्कही न लावता विनाकारण फिरणारे नागरिकही जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.

पहिला डोस मिळतो, तर दुसरा नाही...

एप्रिल महिन्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींचा तुटवडा झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३३ केंद्रांपैकी ४ केंद्रेच सुरू होती. आजमितीस ३३ हजार ६०० डोस उपलब्ध झाले आहेत. तरीही काही ठिकाणी लस मिळत नाही, अशी नागरिकांची ओरड सुरू आहे.

लसीकरण केंद्रावर कंत्राटी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी वेळेवर न येता कोणत्याहीवेळी केंद्रावर येत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. तरच नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनचे डोस वेळेवर मिळतील.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी (पहिला डोस ६६७१, दुसरा डोस ४१६१), फ्रंटलाईन वर्कर्स (पहिला डोस ९९८६, दुसरा डोस ३०१८), ज्येष्ठ नागरिक (पहिला डोस २९९५०, दुसरा डोस ७४०५), ४५ ते ५१ (पहिला डोस १८४०१, दुसरा डोस ५०४०), १८ ते ४४ (पहिला डोस ४२७६)

१ एप्रिल, १० एप्रिल, २० एप्रिल, ३० एप्रिल आणि ८ मे या कालावधीतील

तालुकानिहाय टेस्टिंग/ पॉझिटिव्ह

हिंगोली - टेस्टिंग (१०६२)

पॉझिटिव्ह (२८३)

वसमत-टेस्टिंग (५०२)

पाॅझिटिव्ह (१०८)

कळमनुरी -टेस्टिंग (४१३)

पॉझिटिव्ह (२४१)

सेनगाव -टेस्टिंग (३५२)

पॉझिटिव्ह (९१)

औंढा नागनाथ -टेस्टिंग (४०९)

पॉझिटिव्ह (७७)

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

मध्यंतरी कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसींचे डोस संपले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आता जिल्ह्यासाठी दोन्ही लस भरपूर प्रमाणात आली आहे. नागरिकांनी लस तर आवश्यक घ्यावीच. त्याचबरोबर विनाकारण आणि विनामास्क बाजारात फिरू नये. लस घेतल्यानंतरही पंधरा-वीस दिवस स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी