शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीच्या स्थानकात नाहीत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:52 IST

येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.हिंगोली येथील बस स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी आगारातीलच जागेत शेडमध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून स्थानक उभारण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी सुविधा नाहीत. त्यात पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याने सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बसेस वेळेवर धावत नाहीत. तर लांब पल्ल्यावरील बस कधी मार्गावरून धावत आहेत, तर कधी ताळमेळ नाही, अशी गत झाली आहे. या कारभाराला मात्र हिंगोलीकर व बाहेरून येणारे प्रवासी मात्र वैतागले आहेत. शिवाय प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. लोकमतने गुरूवारी बस स्थानकातील सुविधेसंदर्भात प्रवाशांशी संवाद साधला असता ते म्हणाले, बसस्थानकात सुविधा नाहीत. पिण्याचे पाण्याची सुविधा कोठे आहे दाखवा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात होता. बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवासी खाली बसत आहेत. स्वच्छतागृहातही अस्वच्छतेचे साम्राज्य असून बाजूच्या कामाची धूळही येत असल्याचे प्रवासी सांगत होते.असुविधा : प्रवाशांच्या प्रतिक्रियारिसोड येथे जाण्यासाठी बसा स्थानकात दुपारी १२ वाजल्यापासून ताटकळत बसलो आहे. परंतु दीडतास होऊनही बस आलीच नाही. असे प्रवासी दीपक चिठ्ठे म्हणाले. तसेच स्थानकात सुविधा नसून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.फाळेगाव येथे जाण्यासाठी जवळपास सव्वातास बसस्थानकात बसून आहे,अशी प्रतिक्रिया मारोती कुबडे या प्रवाशाने दिली. शिवाय स्थानकात बसण्यासाठी अपुरी जागा असल्याने खाली बसण्याशिवाय पर्याय नाही. असेही कुबडे म्हणाले.अफरोज जहागीरदार म्हणाले हिंगोली येथील बस स्थानकात पिण्याचे पाणी नाही.काही बस चालकांची बदली झाली, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे चालकांचा तुटवडा आहे. परंतु नियोजन केले जात आहे.-आगारप्रमुख चौतमल.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळHingoliहिंगोली