शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सीएए, एनआरसी विरोधात हिंगोलीत मुस्लिम बांधवांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:41 IST

केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी, राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

ठळक मुद्देकार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमधून नेत असताना काहीजण व्हॅनच्या टपावर चढले या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा सहभाग

हिंगोली : मुस्लिमबांधवांच्या वतीने सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याच्या विरोधात हिंगोलीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. या काळ्या कायद्यांना रद्द करून डिटेंशन सेंटरचे काम त्वरित बंद करण्याची मागणीही निवेदनात केले आहे. 

राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रात २0१४ ला भाजपप्रणित सरकार आल्यापासून देशात नवनवीन कायदे आणले जात आहेत. त्यामुळे अराजकतेचे वातावरण निर्माण होत असून सामाजिक विभाजनाचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे देशात बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील घसरण, रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई, भ्रष्टाचार, उद्योगधंद्यांची झालेली वाईट परिस्थिती जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे कायदे आणले जात आहेत. महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. या सरकारला जनता वरील मुद्यांवरून जाब विचारण्याच्या तयारीत असतानाच सीएए, एनआरसी, एनपीआरसारख्या बाबी समोर आणल्याचा आरोपही केला आहे.  दिल्लीतील शाहीनबागचे शांततापूर्ण आंदोलन अवैध ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे जेलभरो आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले.

या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. दुपारी दीड वाजेपासून शहरातील इंदिरा गांधी चौकात समाज बांधव जमू लागले होते. जवळपास दीड तास घोषणाबाजी झाली. यात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलीस या कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमधून नेत असताना काहीजण व्हॅनच्या टपावर चढले होते. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनHingoliहिंगोलीArrestअटक