शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कार्यालयात कोंडले; अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 18:00 IST

Mahavitaran employees locked in office by villagers : डाेंगरकडा परिसरातील डोंगरकडा फाटा, भाटेगाव, वरुड, हिवरा गावातील वीजपुरवठा रात्री - अपरात्री सतत पाच - दहा मिनिटाला खंडित होत हाेता.

ठळक मुद्देमहावितरणच्या कारभाराला कंटाळून ग्रामस्थ संतप्त

डोंगरकडा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील महावितरणच्या कारभाराला कंटाळून येथील ग्रामस्थांनी कार्यालयात बसलेल्या वीजकर्मचाऱ्यांना शनिवारी दुपारी १२ वाजता कोंडले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी त्यांना सोडले नव्हते. याठिकाणी पाेलिसांसह ग्रामस्थांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती. ( MSEDCL employees locked in office by villagers; Anger expressed by irregular power supply n Hingoli ) 

डाेंगरकडा परिसरातील डोंगरकडा फाटा, भाटेगाव, वरुड, हिवरा गावातील वीजपुरवठा रात्री - अपरात्री सतत पाच - दहा मिनिटाला खंडित होत हाेता. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक हाेत, डोंगरकडा येथील वीजवितरण कार्यालयात असलेले कनिष्ठ अभियंता प्रकाश जाधव यांच्यासह लाईनमन यांना १० जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यालयाला कुलूप लावून काेंडले आहे. सततचे भारनियमन, अनियमित वीजपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्यांनी यापूर्वीही महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत हे प्रकार थांबविण्याची मागणी केली हाेती. परंतु पाच- पाच मिनिटाला वीजसेवेचा खेळखंडोबा होत असल्याने, ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रात्रीला खंडीत हाेत असलेला वीजपुरवठा यामुळे उकाडा जाणवत आहे. पाऊस नसल्याने अनेकांना पिकांना पाणी देण्यास अडचण हाेत हाेती. यासह अनियमितेच्या कारभाराविरूध संतप्त हाेत १७ मे रोजी याच कारणावरून अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये डांबून ठेवले होते.

याघटनेला दाेन महिने हाेत नाहीत, ताेच वीजवितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत वीजपुरवठा कामात सुधारणा केली नाही. तसेच डोंगरकडा, हिवरा फिडर वेगवेगळे करा, डोंगरकडा फाटा इरिगेशनचे रोहित्र चालू करावे, कार्यालयामधील लाईनमन हे आपल्या सोयीच्या ठिकाणावरून ये- जा करतात. यापैकी एकही अधिकारी किंवा कर्मचारी हे मुख्यालयी राहत नाहीत यासह अनेक समस्यांची साेडवून हाेत नसल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी डोंगरकडा येथील वीज वितरणच्या कार्यालयाला कुलूप लावत कर्मचारी व अधिकाऱ्यांना काेंडले. सांयकाळी ५ वाजेपर्यंत त्यांना साेडण्यात आले नव्हते. याप्रसंगी पप्पू अडकीने, विजय गावंडे, अशोक अडकीने, डॉ. सुधाकर लोमटे, यशवंत पंडित, उध्दव गावंडे, जनार्धन गावंडे, रविकुमार पंडित, शेख जावेद, गंगाधर अडकीने, किशनराव गावंडे, पप्पू व्यवहारे, संजय अडकीने, गजानन गावंडे यांच्यासह भाटेगाव, वरुड, हिवरा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, बापूराव बाभळे, प्रभाकर भोंग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोली