शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:54 IST

जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिंगोलीच्या वतीने बदली विस्थापित शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासन निर्णयामप्रमाणे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनियमितता झाली. त्यामुळे आता या विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.विस्थापित झालेले शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. पंडित नागरगोजे, विजय राठोड, संजय कावरखे, श्रीराम महाजन, विष्णू क्षीरसागर, डुबेवार आदींनी आंदोलनात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनास सादर करण्यात आले. आंदोलनात महिला शिक्षिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.अशी केली अनियमितामहाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अनियमितता कशा प्रकारे केली आहे, याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर शासन निर्णयामधील अवघड क्षेत्र निश्चितीनंतर समानीकरणाने रिक्त ठेवायाच्या शाळानिहाय जागा शेवटपर्यंत अधिकृत प्रदर्शित केल्या नाहीत. शिवाय शेवटच्या टप्प्यात वॉटस्अपद्वारे मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध करून परत त्यातही बदल केला. तसेच बदली प्रक्रिया राबविताना शासन निर्णयामधील टप्प्यांचे पालन केले नाही. समानीकरणाच्या बदल्या, संवर्ग १ ते ४ हे पाचही टप्पे एकदाच राबवून बदली आदेश २८ मे रोजी निर्गमित केले. त्यामुळेच शिक्षक विस्थापित राहिले.आॅनलाईन बदली प्रक्रियेत शासन स्तरावरून ४ था व ५ व्या टप्प्यानुसार बदली प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यात येणार आहेत. सदर प्रक्रियेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणाऱ्या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्यात देण्यात येणार आहे. यासंदर्भाचे पत्र देत शिक्षणाधिकाºयांनी समितीला कळविले होते.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक