लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : वसमत तालुक्यातील कौठा येथे २ आॅक्टोबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्मशानभूमीत आंदोलन करून एकदिवसीय उपोषण करण्यात आले.कौठा येथील युवक सुधीर खराटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मयत सुधीर यांचा मृतदेह वसमत येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात उत्तरीय तपासणीसाठी ठेवला असताना उंदरांनी मृतदेहाचे लचके तोडून विटंबना केल्याच्या धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत संभाजी ब्रिगेडने वसमत येथे उपोषण केले असता, शासकीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन संबधित डॉक्टर व अधिकाºयांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सात महिने उलटूनही याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २ आॅक्टोबर रोजी कौठा येथील स्मशानभूमीतच आंदोलन करण्यात आले.यावेळी एकदिवसीय उपोषण करण्यात येऊन प्रशासनाच्या विरोधात आरोग्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सरण रचून दहनही करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मयत सुधीर यांचे नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौठा येथील स्मशानभूमीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:41 IST