आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत वसमत - परभणी रस्त्यावरील हयातनगर फाट्याजवळ २३ डिसेंबर रोजी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अवैधरित्या देशी दारूसह ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या ग्रामपंचायतची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. यामुळे सध्या देशी दारू मोठ्या प्रमाणात पार्सल होत आहे. यादरम्यान हयातनगर फाट्याजवळ मोटारसायकल क्रमांक एम एच ३८ झेड ५५८३ वरून अंदाजे वरून १३५ बॉटल देशी दारू चोरट्यामार्गाने स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये १३५ बॉटल देशी दारू अंदाजे किंमत ८१०० रूपये व मोटारसायकलची किंमत ४० हजार रूपये असे एकूण ४८ हजार १०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सपोनी गजानन मोरे, जमादार सचिन शिंदे, अरविंद गजभार, लोखंडे यांनी केली. याबाबत सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर सोपान लांडगे रा. बळेगाव ता. वसमत यांच्या विरुद्ध हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाेटाे नं ०१