शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

हिंगोली जिल्ह्यातील आणखी २३६ गावे हगणदारीयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:55 IST

जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.

ठळक मुद्देमुदत संपायला चार दिवस शिल्लक : ३२७ गावांनी केला हागणदारीमुक्तीचा संकल्प पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण ५६३ ग्रा.पं. आहेत. गतवर्षीच्या मिळून एकूण ३२७ ग्रा.पं. आता हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यात औंढा ना.८८, हिंगोली-८0, वसमत-६६, कळमनुरी-६२ तर सेनगावातील ३१ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र औंढा-१३, हिंगोली-३१, वसमत-५३, कळमनुरी-६३, सेनगाव-७६ अशा २३६ ग्रा.पं.मध्ये हागणदारीमुक्ती होणे बाकी आहे.जिल्ह्यात २0१२ च्या सर्वेनुसार १.८१ लाख कुटुंबसंख्या होती. यापैकी १.५४ लाख कुटुंबांकडे शौचालय होते. तर २७ हजार कुटुंबांकडे शौचालय नव्हते. आता ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी दररोज ४५00 शौचालयांचे बांधकाम झाले तरच ते शक्य आहे. मात्र वाढलेली कुटुंबसंख्या लक्षात घेता यंदा ८५ हजार शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५८३१३ बांधले आहेत. तर आता जिल्ह्याचे काम ५८.0८ टक्के पूर्ण झाले आहे. यात औंढा व हिंगोली या दोनच तालुक्यांची कामगिरी समाधानकारक आहे. इतरांची मात्र पन्नास टक्के ते त्यापेक्षा कमीच प्रगती आहे. सेनगाव तालुक्यात तर अवघे २९ टक्के काम झाल्याने या तालुक्याला हागणदारीमुक्त होणेच नाही की काय, असे चित्र आहे.