शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

औंढा पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला; पोलिसांचा दोनदा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

मशिदीत काम करणाऱ्या एकाचा मोबाइल हरवल्याने दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने त्या ...

मशिदीत काम करणाऱ्या एकाचा मोबाइल हरवल्याने दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने त्या क्रमांकावर फोन केला तर तो वसमतला असल्याचे कळाले. समोरचा माेबाइल तर परत करीत नव्हता. उलट मुस्लीम समाजाला डिवचणारे या भ्रमणध्वनीवरून कॉल आल्याने मौलवींसह जमाव संतप्त होता. यावरून पोलीस प्रशासन तपासही करीत होते. हा क्रमांक नेमका कुणाचा आहे, कशामुळे हा प्रकार घडतोय, याची चौकशीही सुरू होती; मात्र हा क्रमांक बंद असल्याने त्यात व्यत्यय येत होता. दरम्यान, काल रमजान ईद झाल्यानंतर आज दीडशे ते दोनशे जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून गेला होता. त्यांनी या प्रकरणाची चौकशी का होत नाही, या कारणावरून पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरूनच ठाण्यावर दगडफेक सुरू केली. पोलिसांचे काही एक न ऐकता ही दगडफेक सुरूच होती. हा जमाव ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने बचावासाठी पोलिसांनी दोनदा गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला. मिळेल त्या दिशेने हे लोक पळू लागले. त्यामुळे त्यांनी आणलेल्या दुचाकी जागीच सोडून दिल्या. अशा तीस ते पस्तीस दुचाकीही नंतर पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे यांच्यासह जिल्ह्यातील इतर ठाण्यातून आलेले अधिकारी जमले. औंढा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या औंढ्याला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दोन अधिकारी व आठ कर्मचारी जखमी

पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्यासह इतर सात ते आठ कर्मचारी या दगडफेकीत जखमी झाले आहेत. यातील काही जणांना चांगलीच दुखापत झाली आहे. या जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या परिसरात दगडांचा खच जमा झाल्याचे पहायला मिळाले.

तीस जणांना घेतले ताब्यात

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी औंढ्यात दाखल होताच या ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या घटनेत दगडफेक करणाऱ्या ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजूनही धरपकड मोहीम सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींवरूनही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

बचावासाठी गोळीबार

गोळीबाराबाबत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना विचारले असता, ते म्हणाले की, मोबाइल हरवल्याच्या तक्रारीनंतर तो मोबाइल ज्याच्याकडे आहे, त्याने शिवीगाळ केल्याने ही मंडळी कारवाईची मागणी करीत होती. आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले, तरीही काहींनी चिथावणीखोर भाषणे केली. काही एक न ऐकता थेट दगडफेक केली. पोलीस जखमी झाल्याने शेवटी बचावासाठी हवेत गोळीबार केला. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल.