शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'व्यसनासाठी पुरुषांनी घरातील राशनही विकले'; हतबल महिला दारूबंदीसाठी धडकल्या जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:15 IST

कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत.

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यातील केलसुला गावातील महिलांची दारूबंदीची मागणीपोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केलसुला गावात अवैधरित्या दारूविक्री केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडूनही याबाबत ठोस कार्यवाही केली जात नाही. शिवाय सेनगाव तहसिल कार्यालयातही यापूर्वीच गावातील महिलांनी दारूबंदीचे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त महिला दारूबंदीसाठी ८ जून रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे गावातील दारूबंदी करावी, या मागणीचे निवेदन दिले.

सेनगाव तालुक्यातील केलसुला येथे अवैधरित्या देशी व गावठी दारू विक्री केली जात असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत, पती दारू पिऊन आल्यानंतर आम्हाला मारहाण करीत आहेत, यावेळी लहान मुलंबाळ भांडण सोडविण्यासाठी येताच त्यांनाही मारहाण केली जाते अशा व्यथा महिलांनी मांडल्या. गावात सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने तरूणाई व्यसनाधिन बनत आहे. कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत. त्यात प्रशासन दखल घेईना, पोलीस प्रशासनही कार्यवाही करेना त्यामुळे आता गावातील सर्व महिला दारूबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यासाठी आल्या होत्या.

यानंतरही दखल घेण्यात आली नाही, तर गावातील सर्व महिला जिल्हाकचेरीसमोर उपोषणास बसणार आहेत. तसा इशाराही निवेदनाद्वारे महिलांनी दिला आहे. निवेदनावर रूख्मिना अंभोरे, पुष्पा अंभोरे, शोभा खेलबाडे, त्रिशला अंभोरे, लक्ष्मीबाई इंगळे, धु्रपताबाई इंगळे, कांताबाई इंगळे, लक्ष्मीबाई इंगळे, वच्छाबाई लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांच्या स्वाक्षरी आहेत. 

रेशनचे धान्यही विक्री सध्या टाळेबंदी दरम्यान रेशनकडून मोफत मिळणारे धान्यही घरातील व्यसनी पुरूष विक्री करत आहेत. त्यामुळे आम्ही महिलांनी करावे तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला. गावात सहजपणे दारू उपलब्ध होत आहे, शिवाय दारू विक्रेतेही दमदाटी करीत आहेत, असेही महिलांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाHingoliहिंगोलीWomenमहिला