शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पती व त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:35 IST

पती आणि त्याची प्रेयसी दोघेही पोलीस कर्मचारी आहेत

हिंगोली : पती आणि त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री नऊ ते दहाच्या वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत विवाहितेचा पती व त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, हिंगोली शहरातील नाईकनगर भागातील पोलीस कर्मचारी गुलाब सुभाषराव होंडराव (वय ३३) यांची पत्नी राधा गुलाब होंडराव (वय २०) हिने राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलाब होंडराव हे हिंगोली शहर ठाण्यात पोना या पदावर कार्यरत आहेत. परंतु त्यांची पत्नी राधा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहर ठाण्यात कार्यरत पोना गुलाब होंडराव व हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे कार्यरत पोलीस शिपाई मीना बबनराव सावळे (वय २८) या दोघांमध्ये अनैतिक संबध होते. याच कारणातून राधा यांचा पती व त्याची प्रेयसी या दोघांनी मिळुन शारीरीक व मानसिक छळ केला. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर राधा होंडराव या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत राधा यांचे वडिल हरिदास सदाशिव राजमाने  (रा. होर्टी ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) यांनी हिंगोली शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुलाब होंडराव व त्याची प्रियसी मीना सावळे या दोघांविरूद्ध राधा यांचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळाची पाहणी...पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि अशोक घोरबांड, पोउपनि केणेकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीPoliceपोलिस