शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती प्रशासकाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:09 IST

संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए. भोसले यांनी सूत्रे स्वीकारले असून निवडणुकीचा माध्यमातून आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचा अध्याय अखेर संपुष्टात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए. भोसले यांनी सूत्रे स्वीकारले असून निवडणुकीचा माध्यमातून आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचा अध्याय अखेर संपुष्टात आला आहे.तडजोड व सत्ता संघर्षाच्या राजकारणातून सेनगाव बाजार समितीत मागील अनेक महिन्यांपासून वाद पेटला होता. या धगधगत्या निखाऱ्यावर फुंकर घालून तो तेवत ठेवण्याचेच काम नेतेमंडळी करीत होती. फोफावलेले गटातटाचे राजकारण व सत्तेची लालसा यामुळे सत्ताधारी गटाचे संचालकच एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिली. त्यामुळे निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या संचालक मंडळाला तीन वर्षांतच बरखास्तीपर्यंतचा टोकाचा प्रवास पहावा लागला. अविश्वास ठराव, ९ संचालकाचे राजीनामे अशा नाट्यमय घटनांनंतर या राजकारणाचा शेवट बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीने झाला आहे. राज्य शासनाने बाजार समितीमध्ये केवळ सातच संचालक राहिल्याने प्रशासकीय दृष्टीने अडचण निर्माण होवू शकते. यामुळे निवडणूक घेण्याचा सूचना देत बरखास्तीचे आदेश काढले.काही महिन्यांनी पुन्हा निवडणूक होईल. परंतु तडजोडीचे राजकारण करणाºया तालुक्यातील राजकीय मंडळींसमोर पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवली तर काय करायचे? असा यक्षप्रश्न कायम आहे. त्याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. राजकीय प्रगल्भतेचा अभाव व सत्तापिपासूंची चंगळ बाजार समितीला मारक ठरली आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ असले तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वर्षच कारभार पाहू शकले. सहकाराच्या राजकरणात आर्थिक सुबत्ता आणणाºया बाजार समितीत सत्ताधारी व विरोधक दोहोंचीही तेवढीच फरपट झाली. शेवटी संचालक मंडळ बरखास्त झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए.भोसले यांनी स्वीकारली आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या बाजार समितीवर प्रशासकांनी पदभार स्वीकारला असल्याने किमान आता तरी चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी