शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा ताफा अडवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 18:46 IST

Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोलीहून वसमतकडे नियोजित कार्यक्रमासाठी येत होता.

वसमत : हिंगोलीहून वसमतकडे येत असताना भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ जलसंपदामंत्री मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनांचा ताफा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानक अडवला. यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जयंत पाटील यांना दिले. आज दुपारी झालेल्या या आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्व कल्पना नव्हती. त्यामुळे ताफा अडवताच चांगलाच गोंधळ उडाला होता. ( Activists of Sambhaji Brigade blocked the convoy of Jayant Patil and Dhananjay Munde) 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोलीहून वसमतकडे नियोजित कार्यक्रमासाठी येत होता. यावेळी भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ  संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अचानक ताफ्यासमोर येऊन घोषणाबाजी केली. कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचे पाहून ताफा थांबला. यानंतर जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. यानंतर आंदोलकांनी मंत्र्यांना निवेदन दिले. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, ज्ञानेश्वर माखणे, विजय डाढाळे, नितीन भोसले, आलोक इंगोले आदींचा सहभाग होता. संभाजी ब्रिगेडने गनिमीकाव्याने केलेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला होता. मात्र, दोन्ही मंत्री आणि आंदोलक यांच्यात संवाद झाल्यानंतर निवेदन देण्यात आल्याने पोलीस प्रशासन यंत्रणाही तणावमुक्त झाली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली