शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:05 IST

ई-केवायसी करणे बंधनकारक ; तिसऱ्यांदा वाढवली मुदत

हिंगोली : प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती. परंतु आता केंद्र शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो. प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आले होती. मात्र या मुदतीत संपूर्ण लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नसल्याने आता केंद्र सरकारने या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.

सरकारने काही महिन्यांपूर्वी केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्डधारकांनी ई- केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. आतापर्यंत दोन वेळेस ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

रेशन दुकानांमध्ये केली आहे सुविधा...रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशीनने ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई-केवायसी करणे बंधनकारक...प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी...जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. या प्रक्रियेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून कोठूनही ई-केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यास पूर्ण करुन घेता येते. तसेच लाभार्थ्यांनी वेळोवेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.- राजेश पुंजल, जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग