गोरेगाव येथील ममताचे प्राथमिक शिक्षण रिसोड येथे झाले. सध्या अमरावती येथे बी कॉमचे शिक्षण घेत आहेत. बालपणापासून क्रिकेटची आवड असल्याने प्राथमिक शिक्षणात शालेय क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवत खेळास सुरुवात केली. राज्यस्तरीय सी. के. नायडू कप २०१३ -२०१४, विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे बीसीसीआय बोर्डाची क्रिकेट स्पर्धा, सुपर सेवन अंडर नाईंटींन नॅशनल क्रिकेट स्पर्धेत ऑल राऊंडर क्रिकेट खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली.
स्वामी सदानंद कप ऑल इंडिया इविटेशन टेनिसबॉल क्रिकेट चॅम्पियनशिप हरिद्वार येथे नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये तिने अर्धशतकीय खेळी करत वुमन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. तिची टेनिसबॉल फेडरेशन ऑफ इंडिया कडून २०२१ मध्ये इंडो- श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल महिला टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल गाेरेगावात सत्कार करण्यात आला. फाेटाे नं २१