शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार रेकॉर्ड बनविण्याचे रखडले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:58 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही. याबाबत शिक्षण खात्यातील संबंधित विभागाला विचारले असता, बिले तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हे नित्याचेच बनले आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८६९ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रूपये म्हणजेच १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही. शिक्षण विभागातील शलेय पोषण आहार विभागाकडे याबाबत माहितीही उपलब्ध नाही. केवळ बिल तयार करण्याची कामे सुरू असल्याचे टोलवा-टोलवी उत्तरे ऐकवयास मिळत आहेत.पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही. मागील पंधरा दिवसांपासून शाळेत तांदूळच उपलब्ध नसल्यामुळे मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित आहेत. अन् आता उन्हाळ्याच्या सुट्यांत तांदूळ वाटपाचीप्रक्रिया मागील दोन दिवसांपासून सुरू केली. मात्र आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्याने तांदूळ सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येणार हे निश्चित आहे. ऐन सुट्यांच्या कालावधी आता तांदळाचा पुरवठा केला जात आहे.शालेय पोषण आहारच्या तांदूळ वाटप केला जात आहे. आणि मे महिन्यात शाळांना सुट्याही लागणार आहेत. त्यामुळे शाळेतील तांदूळ सांभाळण्याची जबाबदारी वाढली आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी