शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातील उमेदवारांवर महावितरणची मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:34 IST

वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.महावितरणच्या वतीने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या एका वर्षाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची भरती होत आहे. यामध्ये ५ ते ७ हजारांपर्यंतच्या वेतनावर उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या भरतीत बहुतांश ठिकाणी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांना इतर जिल्ह्यात संधी मिळाली नाही. मात्र हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत खा.राजीव सातव यांनाही शिष्टमंडळ भेटले. त्यात इतर जिल्ह्यांच्या याद्याच पुराव्यादाखल दाखविल्या. त्यात जिल्ह्यातील उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सातव म्हणाले, आपल्या जिल्ह्यात प्राधान्य नाही अन् इतर जिल्ह्यातही नोकरी मिळणार नसेल तर येथील मुलांनी जायचे कुठे? कोणत्या तरी एका धोरणावर ठाम राहून महावितरणने भरती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. काँग्रेसचे आमदार विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करतील.याबाबत अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात सर्वत्रच भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन अर्ज करायचे होते. गुणवत्तेनुसारच भरतीचा आदेश आहे. जिल्ह्यात प्राधान्याचा विषय नाही. मात्र कुणी चूक केली म्हणून आम्ही का करावी?

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण