शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण देणार डिजिटल नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:59 IST

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.त्यामुळे आता थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालानुसार आयोगाने राज्यात महावितरणला थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठविण्यास परवानगी दिली असून डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे. महावितरणने मागील काही वर्षांपासून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. मोबाईल नोंदणी झालेल्या वीज ग्राहकांना वीजपुरवठा व विजेसंबंधी विविध बाबींची माहिती महावितरणतर्फे देण्यात येत आहे.महावितरणने राज्यभरात २ कोटी ५ लाख तर नांदेड परिमंडळातील ६ लाख ९५ हजार ८९८ ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ३ लाख ६७ हजार २४८ ग्राहकांचा तर परभणी जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ५४३ तसेच हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार १०७ वीजग्राहकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे अधिक सोयीचे झाले असून वीजग्राहकांना आता कुठलीही पळवाट राहिलेली नाही.राज्यभरात २ कोटी ५ लाख ग्राहकांची मोबाईल नोंदणीमहावितरणने राज्यभरात २ कोटी ५ लाख तर नांदेड परिमंडळातील ६ लाख ९५ हजार ८९८ ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण