शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘डॅशबोर्ड’ तंत्रामुळे महावितरण हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:43 IST

दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे. मागील एक महिन्यांपासून डॅशबोर्ड तंत्राच्या मदतीने कार्यालयीन कामे केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या कामांमध्ये सुरळीतता येत असून सर्व कामे आता डॅशबोर्डच्या मदतीने केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी लोकमत शी बोलताना दिली. डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे माध्यम म्हणजेच डॅशबोर्ड होय. डॅशबोर्ड अंतर्गत विविध माहिती आॅनलाईन व एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये वीजजोडणी, ग्राहक तक्रारी, ऊर्जा अंकेक्षण, साधन सामुग्रीची उपलब्धता व इतर माहिती उपलब्ध आहे. ग्राहकसेवा केंद्रस्थानी ठेवत महावितरण तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग राबवित आहे. यामध्ये ग्राहकांचा मोबाईल क्रमांक नोंदवून त्यांना 'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग, वीजबिल यासोबतच वीज बंद राहण्याबाबतची माहितीही दिली जात आहे. डॅशबोर्ड हाताळण्यासाठी राज्यभरातील कर्मचाºयांना या सुविधेच्या वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे.तक्रारी : सर्व अचूक माहिती बघता येणारतक्रारी, दिलेले वीज बिल, ग्राहकांनी केलेला भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये आॅनलाइन उपलब्ध झाले आहे. डॅशबोर्ड प्रणालीमुळे महावितरणची सर्व माहिती अचूक व एकसमान मिळण्यास मदत होणार असल्याचे महावितरणने सांगितले.वीजवितरण क्षेत्रात झपाट्याने बदल गरजेचा आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तरच महावितरण स्वबळावर सक्षमपणे उभे राहू शकेल. अन्यथा दूरसंचार क्षेत्रासारखी परिस्थिती उदभवू शकते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.हिंगोली शहरातील थकीत वीजबिल वसूली मोहिमेस ५ फेबु्रवारीपासून सुरूवात केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी सांगितले. बिलभरणा न करणाºयांचा पुरवठा खंडीत केला जाईल.