शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

Maharashtra Election 2019 : कळमनुरीत बंड शमले, वसमतमध्ये कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 18:20 IST

डखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती.

ठळक मुद्देहिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातवसमतमध्ये चौरंगी लढत

- विजय पाटील 

हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती. त्यात कळमनुरीतील भाजप बंडखोरांनी माघार घेतली असली तरीही वसमतला मात्र बंड कायम राहिले. हिंगोलीतून सेनेच्या बंडखोराने माघार घेतली.  

या निवडणुकीपूर्वी युती होणार नसल्याच्याच चर्चा होत्या. त्याच अनुषंगाने मतदारसंघ शिवसेनेला असताना कळमनुरीवसमतमध्ये भाजपची तर हिंगोली भाजपला असताना शिवसेनेची तयारी सुरू होती. युती न झाल्याने प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे यांनी कळमनुरीतून अपक्ष निवडणूक लढण्याचा चंग बांधला होता. त्यांना रासपचे विनायक भिसेही साथ द्यायला निघाले होते. तर वंचितने उमेदवारी न दिल्याने डॉ.दिलीप मस्केही रिंगणात राहण्याची तयारी करीत होते. या सर्व बाबी शिवसेनेची डोकेदुखी ठरल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर या सर्वच दिग्गजांनी माघार घेतली. त्यामुळे मार्ग सुकर झाल्याने सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांच्या एंट्रीने काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात तब्बल दहा जणांनी माघार घेतली असून फक्त सात जण रिंगणात आहेत. त्यामुळे तगडी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणातहिंगोली मतदारसंघात भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख, बसपाचे सुरेश गायकवाड यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे इतर पक्षीय व अपक्षांमुळे लढतीतील रंगत वाढणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे रामेश्वर शिंदे यांनी दबावतंत्र म्हणून दाखल केलेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली आहे.

वसमतमध्ये चौरंगी लढतवसमत विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे राजू नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे शेख फरीद तसेच भाजप बंडखोर तथा अपक्ष शिवाजीराव जाधव या दिग्गजांना आता जिवाचे रान करावे लागणार आहे. या मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ९ जणांनी माघार घेतल्यानंतर १२ जण रिंगणात राहणार आहेत. इतर अपक्ष उमेदवारांमुळे कोणाच्या पायावर धोंडा पडतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपची बहुतांश यंत्रणा जाधव यांच्या मागे उभी राहिली. तर राष्ट्रवादीतील असंतुष्टांचा गट उद्या नेमका काय निर्णय घ्यायचा, हे ठरविणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीhingoli-acहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीbasmath-acवसमत