शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत केवळ १९.५५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:08 IST

चार इव्हीएममध्ये बिघाड

हिंगोली : सकाळी अकरा वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात सरासरी १९.५५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कळमनुरीत होत असून २१.२३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.    

हिंगोली मतदार संघात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान झाले आहे. वसमत मतदार संघात १८.४८ टक्के मतदान झाले आहे.बाभुळगाव येथे एक तासभर मशीन बंद

सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे एकूण चार बुथवर सकाळी मतदान सुरू झाले. यावेळी बुथ क्रमांक ११३ ची मशीन तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ९ वाजता अचानक बंद पडली. यावेळी हिंगोली वरून आलेल्या कर्मचाºयांनी मशीन दुरुस्त केली. त्यानंतर सकाळी दहा वाजेपासून सुरळीत मतदान सुरू झाले ११३ क्रमांकाच्या बुथवरील मशीन बिघाडामुळे जवळपास तासभर एका बूथवर मतदान ठप्प होते. असताना मतदारांना   ताटकळत थांबावे लागले. काही मतदार मतदान  न करताच घरी परतल्याचेही दिसून आले.

फाळेगाव येथे ग्रामस्थांची पोलिसासोबत वादफाळेगाव येथील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास मतदान केंद्राच्या परिसरात असलेल्या ग्रामस्थांची बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसोबतच वाद झाला होता. यामुळे मतदान केंद्र परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

सापडगाव येथेही मशिनमध्ये तांत्रिक बिघाडसेनगाव तालुक्यातील सापडगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना दोन तास ताटकळत बसावे लागले. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे यांनी ही अफवा असल्याचे सांगितले.

चार इव्हीएममध्ये बिघाडहिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभेत एकूण १ हजार १ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४ मतदान केंद्रांवरील इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया जवळपास एक ते दोन तास बंद होती. वसमत विधानसभा क्षेत्रातील परळी दशरथे येथील मशिनमध्ये बिघाड झाल्याने दीड तास मतदान बंद होते. मशिन दुरूस्तीनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019basmath-acवसमतhingna-acहिंगणाkalamnuri-acकळमनुरी