शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सारंगस्वामी यात्रेत दीडशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:02 IST

औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते.या वर्षी १५० क्विंटल भाजीच्या महाप्र्रसाद करण्यात आला होता. शिरडशहापूर येथे वीरशैव बांधवाचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वर्षांपासून दरवर्षी मकरसंक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या यात्रेत भाजीच्या महाप्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत येणारे भाविक सोबत पोळ्या घेऊन येतात. येथे तयार केलेला भाजीचा प्रसाद घेऊन भोजन करतात. तसेच भाजीचा प्रसाद घरीदेखील घेऊन जातात. येथे परिसरातील भाविक गाडी बैलाने डोक्यावर शेतातील भाजीपाला घेऊन येतात. यात टोमॅटो, वांगी, चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी, करडी, पानकोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर, काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १५० क्विंटल भाज्याचा यात समावेश असतो. त्या सर्व भाज्या कढईत मिसळून त्यात गोडतेल मसाला टाकून फोडणी देण्यात येते, अशा भाजीचा प्रसाद तयार करण्यात येतो. या प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात येते. यात्रेसाठी चारचाकी, दुचाकी तीन चाकी वाहने तसेच पायदळ देखील भाविक येथे येत असतात. यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बसची व्यवस्थाही केली होती. या यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानांसह, धार्मिक पुस्तके धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आली होती. भक्तीमय वातावरणात यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.शिरडशहापूर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी ग्रामस्थांनी भाजीच्या महाप्रसादासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक