शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:22 IST

येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.मागील २५ वर्षापासून संत नामदेव येथून निघणाऱ्या पालखीचे हिंगोलीकरांना मोठे आकर्षण असते, या क्षणाची वर्षभरापासून प्रतीक्षा केली जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून हिंगोलीत रिंगणाची परंपरा निर्माण झाली आहे. हिंगोली पालिकेच्या वतीनेही रिंगणाची तयारी केली होती. यंदा रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्यामुळे पहिल्यांदाच मैदानाच्या अगदी मधोमध रिंगण करण्यात आले होते. पालखीमध्ये वयोवृद्धांसह १० ते १५ वर्षांखालील मुले सहभागी झाले होते. शिवाय, डोक्यावर तुळस घेऊन महिलांही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रामलीला मैदानावर नियमितप्रमाणे पालखीची पूजाअर्चा करुन महाआरती घेण्यात आली. नंतर मान्यवरांचा व दिंडीतील सहभागी वारकºयांचा सत्कार करण्यात आला. तर पालखी सोहळ्यातील सहभागी चिमुकल्यांनी विविध देखावे सादर केले. तर भजनी मंडळीनी भजन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडले. विविध चालींवरील भजने गातानाच पायाचा तालही धरला जात होता. हे दृश्यही मन वेडावणारे होते. नंतर मुख्य असलेल्या रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. यामध्ये मानाचा आश्व फिरविल्यानंतर इतर आश्वांनी रिंगणच दणाणून टाकले. तर बरेच घोडेस्वार घोड्यावर उभे राहून स्वारी करीत होते. त्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण अनेकजण डोळ्यात प्राण आणून पाहत होते. तर रिंगण पाहण्यासाठी आलेले महिला आणि पुरुष टाळ्या वाजवून घोडेस्वरांना प्रोत्साहित करीत होते. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र अश्वांची संख्या वाढली होती.तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरीकेटस्ही लावले होते.मान्यवरांची उपस्थिती : ग्रामीणचीही गर्दीयावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सपत्निक आरती केली. तर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, तहसीलदार गजानन शिंदे, सीओ रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, अनिता सूर्यतळ, रामेश्वर शिंदे, बिरजू यादव, गणेश लुंगे, श्रीराम बांगर, दिनेश चौधरी, चंदू लांडगे, खंदारे, लव्हाळे आदी हजर होते.हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील वारकरी मंडळीही आली होती. अनेकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून रिंगण सोहळ्याला हजेरी लावली होती. तर गर्दीमुळे हा सोहळा पाहण्यास अडचण येत असल्याने काहींनी जवळच्या झाडांच्या आश्रय घेतला.आज प्रस्थानरिंगण सोहळा आटोपल्यानंतर शहरातून फिरून ही पालखी कल्याण मंडपम् येथे मुक्कामी होती. या ठिकाणी अनेकांनी पालखी दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक