शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:16 IST

आजी-आजोबांसोबत प्रवासाला गेलेली पाच वर्षाची चिमुकली बसमध्ये बसली. आजी-आजोबा उतरले पण ती चुकून बसमध्येच राहिली. तिचा प्रवास सुरूच राहिला. गाडी चालली पण आजी-आजोबा दिसेनात त्यामुळे गलबललेली चिमुरडी रडायला लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : आजी-आजोबांसोबत प्रवासाला गेलेली पाच वर्षाची चिमुकली बसमध्ये बसली. आजी-आजोबा उतरले पण ती चुकून बसमध्येच राहिली. तिचा प्रवास सुरूच राहिला. गाडी चालली पण आजी-आजोबा दिसेनात त्यामुळे गलबललेली चिमुरडी रडायला लागली. प्रवाशांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने घाबरली. तिला नाव, पत्ता काहीच सांगता येईना. वाहकाने तिला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार सविता बोधनकर यांनी तिला मायेने सांभाळले. दोन तासांनंतर तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले.हदगाव तालुक्यातील घोगरी येथील रहिवासी असलेले इरप्पा नागा रेपनवाड हे आपली पत्नी यल्लाबाई व पाच वर्षांची नात सुप्रिया यांना सोबत घेऊन नांदेडहून गावी घोगरीकडे निघाले. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकातून ते औसा- अकोला या बस क्र.एमएच-२०-बी-२२५४ मध्ये बसले. वारंगा फाटा येथे बस बदलून हदगावकडे पकडण्यासाठी उतरले. बसमधून नातही उतरली असावी, असे त्यांना वाटले. इकडे बस चालू झाली. काही वेळानंतर आजी-आजोबा सोबत नाहीत, हे लक्षात येताच सुप्रिया रडायला लागली. प्रवाशांनी विचारपूस केली पण भांबावलेल्या सुप्रियाला काहीच बोलता येईना. अखेर चालक-वाहक, प्रवाशांनी सुप्रियाला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिला रडू आवरता येत नव्हते. फौजदार सविता बोधनकर यांनी तिला प्रेमाने आपलेसे केले. कुरकुरे, चॉकलेट खायला दिले. ठाण्यात उभारलेल्या गार्डनमध्ये झोक्यावर खेळविले. हरवलेल्या या लहान लेकरास खेळविताना ठाणेच जणू पाळणाघर झाले. दरम्यान, हिंगोली, लातूर, नांदेड सर्वत्र वायरलेसवर मॅसेज दिला. फेसबुक, व्हॉट्सअपवर संदेश दिला. वारंगा चौकीच्या पोलीस कर्मचाºयांना गस्त घालताना म्हातारी, म्हातारा नात हरवली म्हणून रडत बसल्याचे आढळले. त्यांची विचारपूस करून त्यांना मुलीचा फोटो दाखविला. ओळख पटल्यावर ठाण्यात आणले.पो.नि. व्यंकट केंद्रे, पोउपनि सविता बोधनकर, पोना शेख बाबर, अर्शद खान यांनी सुप्रिया हिस आजी-आजोबांच्या सुपूर्द केले. बाळापूर ठाण्यात आॅपरेशन मुस्कान यशस्वी झाले.