शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने दोन कुटुंबांचे आधारस्तंभच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:06 IST

मयत दोघांच्याही कुटुंबियांचा आक्रोश मने हेलावणारा

ठळक मुद्दे पंधरा दिवसांत दुसरी घटना

वसमत : येथे मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम करत असताना लोखंडी शिडी ११ के.व्ही. तारांना लागल्याने दोन जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मयत झालेले दोघेही त्यांच्या कुटुंबाचे मुख्य आधार होते. या घटनेने दोन कुटूंब उघड्यावर आले. घटनास्थळी या कुटुंबियांचा आक्रोश सगळ्यांची मने हेलावून टाकणारा होता. 

वसमत येथे नव्याने होत असलेल्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या लोखंडी कमानीचे काम सुरू होते. या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेले विलास गिरमाजी पतंगे (५४, रा. सोमवारपेठ, वसमत) व सिद्धार्थ केशव वाघमारे (३५, रा.गणेशपूर वसमत) हे दोघे कर्मचारी विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. अति उच्च दाबाच्या तारांना लोखंडी शिडी स्पर्श झाली आणि क्षणातच त्यांच्या शरीराचा कोळसा झाला. मयतांपैकी विलास पतंगे हे शहरातील अन्य मंगल कार्यालयांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. अत्यंत गरीब कुटूंबातील असलेले पतंगे हेच त्यांच्या कुटूंबाचा आधार होते. हे मंगल कार्यालय नव्याने झाल्याने ते तेथे रूजू झाले होते. उत्साहात मंगल कार्यालयाच्या बांधकामापासून त्यांनी काम पाहिले. मात्र मंगल कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, २ मुली असा परिवार आहे. 

या दुर्घटनेत मयत झालेला दुसरा तरूण सिद्धार्थ केशव वाघमारे (३५) हा गणेशपूर येथील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटूंबातील मनमिळावू व्यक्तीमत्व व कष्टाळू तरूण मंगल कार्यालयात कर्मचारी म्हणून नियुक्त झाला. त्याच्या पश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. सिद्धार्थ वाघमारे हाच घराचा आधार होता. आता त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सापडले आहे. विजेच्या धक्क्याने दोन जीव घेतले. सोबत दोन कुटुंबही उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी दोन्ही मयताचे कुटूंबिय दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश सुन्न करणारा होता. प्रत्येकाचे डोळे पाणावणारा हा प्रसंग हृदय हेलावून टाकणारे होते. मयत कुटूंबियांना मदत व्हावी, अशी अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करत होता. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि बळीराम बंदखडके यांनी केला. हे दोन्ही अधिकारी तत्परतेने घटनास्थळी धावले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

पंधरा दिवसांत दुसरी घटनाकुरूंदा येथेही शिडी तारांना लागून दोन जण ठार झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच कुरूंदा येथे नवीन दुकानावर नाव काढण्यासाठी शिडी लावत असताना शिडी तारांना लागली व दोन जण जागीच ठार झाले होते. कुरूंदा व वसमत येथील दोन्ही घटनांत साम्य आहे. दोन्ही जागी शिडी तारांना लागून दुर्घटना झाली. पंधरा दिवसांतीलच या दोन घटनांत वसमत तालुक्यात चौघांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीelectricityवीज