शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून खून प्रकरणात एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:51 IST

इतर चौघांना भोगलेल्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देलाठ्या-काठ्या, चाकूने मारहाण केली

हयातनगर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पळशी येथे झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतर चौघांना भोगलेल्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.

पळशी शिवारात शेतीच्या वादातून ९ जानेवारी २0१५ रोजी दुपारी गोविंद रामकिशन डांगरे, रमेश किशनराव डांगरे, कविता रमेश डांगरे, कुशीवर्ता रामकिशन डांगरे यांनी गोपाळ शिवाजी डांगरे, दादाराव डांगरे आदींना लाठ्या-काठ्या, चाकूने मारहाण केली होती. यात गोपाळचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास फौजदार मो.जमील खाजा हुसेन यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गोविंद राकिशन डांगरे यांना कलम ३0२ अन्वये जन्मठेप  व पाच हजारांचा दंड, कलम ३0७ अन्वये ५ वर्षे तुरुंगवास व ५ हजार रुपये दंड, कलम ३२६ अन्वये ३ वर्षे तुरुंगवास व ३ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. तर रमेश डांगरे, रामकिशन डांगरे, कविता डांगरे व कुशीवर्ता डांगरे यांना विविध कलमान्वये त्यांनी भोगलेली शिक्षा व प्रत्येकी ३ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन नायक, अ‍ॅड. एस.डी कुटे अ‍ॅड.एस.के.दासरे, अ‍ॅड. नंदकुमार काकाणी आदींनी काम पाहिले.

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोलीLife Imprisonmentजन्मठेप