शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२४ रोजी आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:40 IST

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून कायम होते. आता २४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाल्याची नांदी मानली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून कायम होते. आता २४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाल्याची नांदी मानली जात आहे.बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मागील वर्षभरापासून काँग्रेसकडून तगादा लावला जात आहे. मात्र यावर प्रशासकीय मंडळ लादत सत्ताधारी भाजप-सेनेकडून निवडणुका लांबविल्या जात असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर सहकार खात्याने या निवडणुकांच्या कायद्यात बदल केला. १0 आरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्यांना मतदानाची संधी देण्यात आली आहे. पूर्वीच्या प्रकारात बदल झाला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम, २0१७ नुसार बाजार समिती कार्यक्षेत्राच्या शेतकरी मतदारसंघाचे १५ समान भागात (गण) संघाचे १५ समान भागात विभाजन केले आहे. यापैकी ५ गणांचे सोडतीने आरक्षण जाहीर करावयाचे आहे. यात महिलांसाठी २ गण, इतर मागास प्रवर्गासाठी १ गण, विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी १ गण तर अनुसूचित जाती/जमातीसाठी १ गण राखीव करायचा आहे. यासाठी २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी १२ वाजता सोडत होणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.बाजार समिती निवडणुकीसाठी ही नवीन पद्धत आल्याने त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समितीची होणारी ही पहिलीच निवडणूक राहणार आहे. यासाठी मतदार याद्यांचे अंतिमीकरण आता होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी