शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:00 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने १०.३७ कोटी रुपये भूसंपादन विभागाकडे जमा केले आहेत.लिगो प्रयोगशाळा प्रकल्पासाठी दुधाळा आणि सिद्धेश्वर या दोन गावातील ४५.४८ हेक्टर खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. यात ७१ शेतक-यांची जमीन जाणार आहे.या जमिनीच्या खरेदीसाठी शासनाने भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी रुपये जमा केले आहेत. तर प्रकल्पासाठी लागणारी ५.९४ हेक्टर जमीन यापूर्वीच ‘लिगो’च्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित १३१.८३ हेक्टर वनजमिनीचा मुद्दा शासनाकडे प्रलंबित आहे. या जमिनीच्या प्रस्तावाला मंत्रालयस्तरावरून मंजुरी गरजेची असते.केंद्र शासनापर्यंत हा प्रस्ताव जाणार असल्याने यासाठी लिगो प्रकल्पाच्या अधिका-यांकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यासाठी यापूर्वीच विशेष प्रकल्पाचा दर्जा देऊन सर्व प्रक्रिया जलद गतीने करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. आता खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसमत उपविभागीय अधिकारी व लिगोच्या अधिका-यांमार्फत ही प्रक्रिया राबविली जात आहे.

वनजमिनीसाठी रेल्वेच्या प्रस्तावाची दिरंगाईवर्धा-यवतमाळ-पुसद या रेल्वेमार्गासाठी ८ गावांची १0७ हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. यामध्ये खाजगी ८१.३0 हेक्टर जमीन होती. यापैकी ७५ हेक्टरचा ताबा रेल्वेला देण्यात आला आहे. तर ६.२४ हेक्टर जमिनीबाबत काम सुरू आहे. या भूसंपादनाची प्रक्रिया महसूल प्रशासनाने गतीने केली असली, तरीही २४ हेक्टर वनजमिनीच्या भूसंपादनासाठी रेल्वेचे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे अजून भूसंपादनाचा प्रस्तावच आलेला नाही. इतर शासकीय जमीन १.४२ हेक्टर लागत असून त्याचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली