शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘लेक शिकवा अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:15 IST

मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे. ३ ते २६ जानेवारी दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शाळेत हा उपक्रम राबवून सदर अहवाल मुख्याध्यापकांनी संबधित तालुक्याच्या गशिअमार्फत ३० जानेवारीपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.शाळेतील मुलींची गळती थांबावी यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. परंतु जिल्ह्यात शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे हे शिक्षण विभागासमोर आव्हान आहे. शिवाय शासनाच्या सूचनेनुसार शाळेतील मुलींची संख्या कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु सदर योजनेची अंमलबजावणी प्रभाविपणे होणे तितकेच गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लेक शिकवा अभियानच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, प्रतिष्ठा आणि गुणात्मक दजार्चे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुलींमध्ये वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करून, गळती कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान राबविले जाणार आहे. हे अभियान ३ ते २६ जानेवारी या कालावधीत राबविण्याच्या सूचना राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक संस्थांना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लेक शिकवा अभियान प्रभावीपणे राबविण्या संदर्भात परित्रपकाद्वारे डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी संबधित तालुक्याच्या गशिअमार्फत ३० जानेवारीपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.३ जानेवारीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. हा उपक्रम ३ ते २६ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. जिल्हाभरात या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेऊन तसा पाठविणे गरजेचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र