शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 20:06 IST

नगरसेवकांच्या पळवापळवीची चर्चा

औंढा नागनाथ : येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर २७ डिसेंबर रोजी नवीन नगराध्यक्षपदाची  निवड होणार असल्याने शिवसेना-भाजप यांच्यात या पदावरून रस्सीखेच होताना दिसून येत आहे. दरम्यान भाजपने नगरसेवकांची पळवापळवी केल्याची चर्चाही शहरात जोरात सुरू आहे. शिवसेनेने धोका दिल्यामुळे पुन्हा भाजप सक्रिय झाल्याची दिसून येत असून नवीन समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

औंढा नागनाथ नगरपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात होती. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती बिघडल्याने राज्यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणानंतर नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रियेत शिवसेनेने सव्वा-सव्वा वर्षाचा भाजप सोबत केलेला करार तोडला आणि थेट काँग्रेससोबत युती करत भाजपला धोका दिला आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनाही ही बाब जिव्हारी लागल्याने त्यांनी २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी चंग बांधला आहे. 

सध्या नगरपंचायतमध्ये शिवसेना ५, काँग्रेस ५, भाजपा ४, राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १ असे एकूण १७ नगरसेवक आहेत. नगरपंचायतमध्ये पूर्वी भाजप व शिवसेनेत सत्ता करार झाला होता. परंतु शिवसेनेने भाजपला यावेळी धोका दिल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे ४ नगरसेवक सोबत घेऊन सहलीला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे ४ व काँग्रेस-राष्ट्रवादी ४ व अजून एक नगरसेवक सोबत घेऊन येणाऱ्या २७ तारखेला भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. शिवसेनेने दिलेला राजीनामा हा केवळ नगरसेवक खूष करण्यासाठी होता; परंतु अस्तित्वात असलेली सत्ता या राजीनाम्यामुळे सध्या धोक्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विजयमाला मुळे व विष्णू जाधव या दोघांत नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा सुरू आहे. परंतु या दोघांनाही या पदापासून दूर ठेवण्याची खेळी भाजपने केली आहे. 

राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा...शिवसेनेचे आ. संतोष बांगर यांनी नगरपंचायतचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी २२ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन सध्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु येत्या २७ तारखेला सेनेचाच नगराध्यक्ष करण्यासाठी नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश दिले.त्यांनी महाआघाडीची सहकारी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सहकार्य केल्याने  पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांनी विश्वास देत शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल अशी ग्वाही दिली. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी महाआघाडीतील नगरसेवक फोडले असून भाजपचाच नगराध्यक्ष होणार असे सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना