शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

जुलैमध्ये २४ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:07 IST

१३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : १३ कोटी वृक्ष लागवड सन २०१८ अंतर्गत जुलै महिन्यात २४ लाख ३२ हजार ६१८ रोपांची लागवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात असून संबंधित विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.पर्यावरण रक्षणासाठी वने आणि वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाने २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून २०१८ च्या पावसाळ्यामध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात वृक्षलागवडीची चळवळ उभी केली जात आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.रोपांचे संगोपन- शासनाकडून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. शिवाय यासंदर्भात प्रशासकीय विभागांना सूचना व नियोजन करून दिले जात आहे. परंतु आतापर्यंत लागवड केलेल्या रोपांची संगोपण कोणत्या विभागाने किती प्रमाणात केले यासंदर्भातही माहिती एकत्रित करून शासनाकडे पाठविण्याचीही आवश्यकता आहे. ज्यामुळे प्रत्येक विभाग रोपांचे संगोपन करण्यास दिरंगाई करणार नाही.हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास ७५ ते ८० टक्के रोपांचे संगोपन करण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी दिली. शिवाय याबाबत संबधित प्रशासकीय विभागाकडून माहितीही मागविली जाईल, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात ४९ रोपवाटिका असून त्यात ४५ लाख रोपे आहेत. हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत दीड लाखांच्या जवळपास रोपांची निगा राखली जात आहे. रोपांसाठी विहीर व बोअरच्या पाण्याची सुविधा आहे. परंतु येथे कार्यरत १८ महिलांच्या मानधनाचा प्रश्न गंभीर आहे. मानधन दर महिन्याला मिळत नाही. मानधन महिन्याला द्यावे, अशी मागणी आहे.वन विभागातर्फे ९ लाख ५१ हजार ३१८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग ६ लाख ४८ हजार, ग्रामपंचायत ५ लाख ५४ हजार २८८ तसेच इतर विभाग यामध्ये कृषि विभागातर्फे २ लाख १० हजार २७०, जि. प. ग्राम विकास विभाग २ हजार ६४२, महसूल विभाग ३७१५, सार्वजनिक बांधकाम विभाग ८६१५, गृहविभाग ६२४०, राज्य राखीव पोलीस बलगट क्र. १२-६०००, जलसंपदा विभाग १८१०, उपनिबंधक सहकार व पणन विभाग ४६२०, शिक्षण संस्था १४६५, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ६९०, आदिवासी विकास विभाग ८६०, सामाजिक न्याय ३४५, सार्वजनिक आरोग्य विभाग २८८०, उर्जा विभाग, १६०५, सर्व आगारप्रमुख ८३५, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय २००, न्याय विभाग १७०, महिला व बालविकास अधिकारी १७५, मुख्याधिकारी हिंगोली तसेच कळमनुरी, वसमत, सेनगाव औंढा नगरपंचायत ७८७५ याप्रमाणे वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन४१३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे २ जून रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी संबधित प्रशासकीय यंत्रणांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रुखांना बैठकीस उपस्थित राहावे लागणार असून नियोजन केले जात आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीenvironmentवातावरण