शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन ते चार दिवस करावी लागते बीटची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:59 IST

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत असून शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होताना दिसत आहे.

राहुल टकले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत असून शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होताना दिसत आहे.येथील हळदीचा मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद घेऊन येतात. मात्र बिट होण्यासाठी तीन दिवस व वजन करण्यासाठी एक दिवस असा चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजार समितीमध्ये शेतकºयांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. नळाला पाणी आहे मात्र फ्रीजर बंद असल्याने शेतकºयांना गरम पाणी प्यावे लागते. स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. मार्च एण्डमुळे मोंढा चार दिवस बंद होता. त्यानंतर अचानक हळदीची आवक वाढली. रोज जवळपास ३ ते ४ हजार पोत्यांची आवक होत आहे. येथील हळदीच्या मोंढ्यात ७ एप्रिल रोजी हळद घेऊन आलेले शेतकरी नारायण डोईफोडे यांच्या हळदीची बिट ९ एप्रिल रोजी झाली. त्यामुळे त्यांना चार दिवस मोंढ्यात ताटकळत बसावे लागले आहे. शेतकºयांना हळदीच्या पोत्यावर झोपून रात्र काढावी लागत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोणत्याही सुविधा शेतकºयांना दिल्या जात नाहीत. शिवाय रात्री हळदीचे पोते चोरी झाल्याच्या घटना घडत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रभर जागे राहून हळदीची राखण करावी लागते. हळदीचा मोंढा टिनपत्रांच्या शेडमध्ये असल्याने दिवसभर उकाड्याचा त्रास तर रात्री हळद चोरी जाण्याच्या भीतीने शेतकºयांना झोप घेणेही कठीण झाले आहे.प्रतिक्रिया: व्यापारी बीट सुरु करु देत नाहीतपूर्वी आठ दिवसांतून दोन दिवस बीट व्हायची. आता आवक वाढल्याने सोमवारी, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बीट होते. सोमवारी आवक जास्त झाली होती. त्यामुळे शेतकºयांना थांबावे लागले आहे. ज्या दिवशी बीट बंद असते त्या दिवशी वाहनांना मोंढ्यात प्रवेश दिला जात नाही. बिटच्या दिवशी सकाळी ७ ते १२ या वेळेत सर्व वाहनांना मोंढ्यात प्रवेश दिला जातो. बीट १२ वाजेला सुरु करण्याची प्रथा आहे. मात्र व्यापारी इतर बाजारपेठेतील भाव तपासल्याशिवाय बीट सुरु करु देत नाही. मनुष्यबळही कमी असल्याने शेतकºयांना त्रास होत आहे.बाजार समितीमधील पाण्याचे फ्रीज बंद असल्याने त्याला गरम पाणी असते. त्यामुळे शेतकºयांना पाणी विकत घ्यावे लागते. एका लिटरसाठी पाच रुपये मोजावे लागत असल्याने विक्रेत्यांची चांदी होत आहे.रविवारी १० पोते हळद घेऊन आलो. मंगळवारी दुपारी ३ वाजता बीट झाली. हळदीचे वजन बाकी असल्याने बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत थांबावे लागणार आहे. जेवन व चहापाण्यासाठी रोजचा ३०० रुपये खर्च येतो. एका पोत्याची किंमत खर्चातच गेली. बाजार समिती कोणत्याच सुविधा देत नसल्याने पाण्यासह सर्वच विकत घ्यावे लागले.-नारायण डोईफोडे, शेतकरी, रा. वाढोना ता. सेनगावचार दिवसांपासून हळदीची आवक वाढल्याने शेतकºयांना जास्त दिवस थांबावे लागत आहे. सोमवारी आलेल्या शेतकºयांना तीन दिवस थांबावे लागले. आता एक ते दोन दिवसात बीट होऊन शेतकरी मोकळे होणार आहे. सोमवारी मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक झाल्याने बीट होण्यास विलंब झाला.-लक्ष्मीकांत पुरोहित, व्यापारी कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड