शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनापूर्वीच अस्थींवर पाणी सोडून विटंबना; हिंगोली जिल्ह्यातील सेनगावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:24 IST

द्वेष भावनेतून करण्यात आलेल्या या कृत्याचा प्रकार माणुसकी हेलावून टाकणारा होता.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात जमावाचा ठिय्या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव मार्गस्थ

सेनगाव (जि. हिंगोली) : सार्वजनिक स्मशानभूमीची अडचण असलेल्या सेनगाव शहरात रविवारी अंत्यसंस्कार केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थींची विसर्जनापूर्वीच अज्ञात इसमाकडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून विटंबना करण्यात आली. अंत्यसंस्कारस्थळी पाण्याचा डोह केल्याने समाजबांधव आक्रमक झाले. हे गैरकृत्य करणाऱ्याविरूद्ध कारवाई करा, अशी मागणी करत आक्रमक नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. 

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही सेनगाव शहरातील स्मशानभूमीची समस्या कायम आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मिळेल, त्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. शहरातील पांडुरंग राऊत यांचे ११ सप्टेंबरला निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर समाजबांधवानी नियोजित स्मशानभूमीच्या जागेवरच अंत्यसंस्कार केले. रविवारी त्यांचा रक्षा सावडण्याचा दिवस होता. मयताचे कुटुंबिय, सर्व नातेवाईक, मित्र परिवार जेव्हा सावडण्याचा विधी करण्यासाठी  पोहोचले, तेव्हा त्याठिकाणी पाणी सोडल्याने अस्थी वाहून गेल्या तर काही पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. त्यामुळे हा प्रकार पाहून सावडण्याच्या विधीसाठी आलेल्यांमध्ये संताप व्यक्त झाला. 

द्वेष भावनेतून करण्यात आलेल्या या कृत्याचा प्रकार माणुसकी हेलावून टाकणारा होता. त्यामुळे विधी न करताच हा जमाव संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सेनगाव पोलीस ठाण्यावर धडकला. दोषीविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. जमाव  ठाण्यात ठाण मांडून बसला होता. 

आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव मार्गस्थपोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी जमावाच्या भावना जाणून घेत शांत राहण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पंचनामा करून दोषीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी गजानन पांडुरंगअप्पा राऊत यांच्या फिर्यादीवरून तुकाराम परसराम फटांगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर जमाव मार्गस्थ झाला. यासंबंधी झालेल्या प्रकाराबद्दल शंभराहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदनही देण्यात आले आहे. दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू