शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'...तर गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही'; प्राचार्यांना मारहाणीचे आ. संतोष बांगरांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:36 IST

सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही.

हिंगोली: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही. सत्तेत आहोत अन्यायविरोधात आवाज उठवायचा नाही का? हातात बांगड्या घातल्या नाहीत. गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांना मारहाणीचे समर्थन करताना आमदार संतोष बांगर यांनी दिली. 

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्राचार्य आणि उपप्राचार्यांना विचारा हे का घडले ? त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले तर मी चुकलो मान्य करेल. त्यांनी का तक्रार दिली नाही ? व्हिडीओ व्हायरल झाला आहे, याची शहानिशा करून माध्यमांनी बोलावे, असे आवाहन आ. बांगर यांनी केले. तसेच सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही. हातात बांगड्या घातल्या नाहीत. मी शिवसैनिक आहे. अन्याय विरोधात आवाज उठवणे कर्तव्यच. महिलेवर अन्याय सहन करून घेणार नाही, त्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही. याप्रकरणी डीसीएम यांना सर्व माहिती दिली आहे. महिलेच्या इज्जतिचा प्रश्न होता म्हणून शांत आहे, नसता त्याच दिवशी प्राचार्य आणि उपप्राचार्यांवर गुन्हा दाखल केला असता, असेही आ. बांगर म्हणाले. 

सत्तेत बसलेल्या आमदारांकडून मारहाण, राष्ट्रवादीची टीका शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांकडून होतात. भाजपच्या आमदारांकडून अशा घटना वारंवार होत आहेत. सत्तेत बसलेले आमदार मारहाण आणि बळजबरी करतायत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी माहिती घेऊन कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय आहे प्रकरणआमदार संतोष बांगर त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. कधी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास मारहाण तर कधी अधिकाऱ्यास फोनवरून धमकावणे, अशा घटना सातत्याने पुढे आल्या आहेत. यावेळीही व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार बांगर एका कार्यालयात असून समोरील व्यक्तीस चोप देत असल्याचे दिसत आहे. ही घटना मागील आठवड्यातील असून हा व्हिडीओ हिंगोली येथील तंत्रनिकेतनमधील आहे. येथील प्राचार्यांच्या विरोधात महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. यावरून आ. बांगर प्राचार्यांच्या कार्यालयात पोहचले. यावेळी  प्राचार्यांवर आ. बांगर यांनी हातउचला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली