शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत गोठे-घरे पेटवून दिल्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:01 IST

शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.बावनखोली येथील घराबाहेरील वस्तू, जनावरांचे गोठे पेटवून देण्याच्या घटना मागील दहा दिवसांपासून घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. १६ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बावनखोली येथील दुग्ध व्यवसायिक गोपाल गायकवाड यांचा गोठा कोणीतरी पेटवून दिला. जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांना वेळीच जाग आली. गायकवाड व त्यांच्या पत्नीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे गुरे वाचली व अधिक नुकसान टळले. परंतु गोठ्यातील जनावारांचा कडबा व इतर साहित्य जळून खाक झाले. याचदरम्यान गायकवाड यांच्या घरापासून काही अंतरावरच शेख रशीद शेख हमीद यांचाही कटलरीचा हातगाडा पेटवून दिल्याचे लक्षात आले. आगीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.अशोक गादेकर यांच्या घरासमोरील खुर्च्या तर संजय इंगोले यांच्या घराला व गोठ्यासही आग लावण्याची घटना घडली होती. मागील दहा दिवसांत घरे, गोठे व बाहेरील वस्तू पेटवून देण्याच्या पाच घटना घडल्याचे नागरिक सांगत होते. वाढत्या घटनांमुळे अखेर नागरिकांनी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार अर्ज दिला.केवळ ठरावीक भागातच घडत असलेल्या घटनांमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जाण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. तर या प्रकरणाचा तपासही गांभिर्याने न झाल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.पोलिसांनी मंगळवारी १२.३० वाजता बावनखोली परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी गोठ्याचा पंचनामा पोलिसांनी केला. परंतु घरे, गोठे व घराबाहेरील वस्तंू कोण पेटवून देत आहे,याचा उलगडा मात्र झाला नाही. जाळपोळीच्या या घटना कोण घडवून आणत आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सदर घटनेची नोंद ठाण्यात करण्यात आली असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले. या प्रकारामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा