शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी हजारो शेतकरी कृषी कार्यालयावर धडकले; लेखी आश्वासनानंतर हटले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 18:49 IST

विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.

हिंगोली : शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्यानंतरही पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर यात १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसेच प्रलंबित १३.८९ कोटी देण्यााचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक मागे हटले.

सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची प्रचंड नासाडी झाली. उत्पन्न घटले. मात्र  विमा कंपनीकडून नुकसान  भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर  विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली. तर अनेकांना जुनाच विमा मिळाला नसताना नवीन विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दि. २३ डिसेंबर रोजी हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर ,  माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर, भास्करराव पाटील , गजानन कावरखे , नामदेव पतंगे , परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामराव अडकिने, मधुकर जामठीकर, कैलास वाबळे, भागवत मुटकुळे आदींसह सेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. तेथून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडकला.तेथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असता तुपकर , गोरेगावकर यांच्या शिष्टमंडळाशी  जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली .