वसमत तालुक्यातील पूर्णा नदी काठावरील वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. लिलाव होण्यापूर्वीच या भागातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. वसमत तहसीलदार बोंळगे रुजू झाल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडका सुरू केला. मात्र सध्या तहसीलदार रजेवर असल्याने पुन्हा एकदा याठिकाणी वाळूचा उपसा सुरू झाला आहे. आडगावसह परिसरातील गावांमध्ये ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसून येत आहेत. याकडे हट्टा मंडलाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे लिलावापूर्वी या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.
याबाबत वसमत प्रभारी तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या ग्रामपंचायत निवडणूक कामात असल्यामुळे कारवाईसाठी पुरेसा वेळ नाही, तरी संबंधित महसूल मंडल अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देऊ असे सांगितले.