शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द केला नाही तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:49 IST

शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून समाजांत भांडणे लावली

कळमनुरी (जि. हिंगोली) : राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर तत्काळ रद्द करावा, अन्यथा ओबीसी समाज मुंबईत धडक देईल, असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी कळमनुरी येथे काढलेल्या ‘एल्गार मोर्चाद्वारे’ दिला.

ओबीसी समाजाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या ‘एल्गार मोर्चात’ हाके बोलत होते. प्रा. हाके म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध राहणार आहे. सद्य:स्थितीत एकही आमदार-खासदार ओबीसी समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाही. शासनाने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून समाजांत भांडणे लावली, असेही हाके म्हणाले. एससी, एसटी व ओबीसी हा ८० टक्के समाज जर एकत्र आला तर राज्यकर्त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आमचे आरक्षण आवश्यक घ्या, परंतु लक्षात ठेवा आमदार-खासदारकीचा मार्ग आमच्या गल्लीतूनच जातो. आता ओबीसींनो, वेळ आली आहे ती म्हणजे एकीची वज्रमूठ आवळायची.

जरांगेंना ‘रिझर्वेशन’चे स्पेलिंगही येत नाही...येणाऱ्या विधानसभेत ओबीसी आमदार निवडून आपल्याला पाठवायचे आहेत. निवडून दिलेले आमदार हे आपल्या हक्कासाठी लढतील. मराठा समाजाने चौथी नापास असणाऱ्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. खरे पाहिले तर मनोज जरांगे यांना ‘रिझर्वेशन’ या शब्दाचे स्पेलिंगही येत नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांच्यावर प्रा. हाके यांनी टीका केली.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणHingoliहिंगोली