शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'मी आत्महत्या करत आहे'; कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेशाने पोलीस यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 12:20 IST

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला. 

ठळक मुद्दे रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.आत्महत्येची धमकी देणारा पोलीस कर्मचारी सुखरूप 

हिंगोली : येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिसांच्या ग्रुपवर पाठविला होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला रात्रभर धावपळ करावी लागली. अखेर आज पहाटेच्या सुमारास तो कर्मचारी सुखरूप असल्याची खात्री पटल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला. हा संदेश वाचल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. रात्री वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या  कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना देत दोन पथके तत्काळ रवाना केली. या पथकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातही शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, कर्मचारी आढळून आला नाही. मोबाईल लोकेशनवरूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोबाईल बंद  असल्याने अंदाज येत नव्हता. त्यामुळे पथकांची चांगलीच दमछाक झाली. 

रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास तो पोलीस कर्मचारी तालुक्यातील खानापूर चित्ता येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथकाने सुटकेचा नि: श्वास सोडला. आत्महत्येची धमकी देणारा पोलीस कर्मचारी सुखरूप असून तो कर्तव्यावर हजर होणार असल्याचे स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय यांनी सांगितले. दरम्यान, त्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येची धमकी नेमकी कोणत्या कारणाने दिली, याची माहिती मात्र समजू शकली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHingoliहिंगोली