शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी आले दीडशे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:28 IST

आधीच दुष्काळी परिस्थिती असून प्रत्येक गावात चार-दोन शेतकऱ्यांकडे मात्र सिंचनाची सोय आहे. इतर शेतकरी बिल भरत नसल्याने या शेतकºयांचीही गोची होत असल्याने लोकप्रतिनिधींकडे खेटे मारून हे शेतकरी हैराण असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी व गावठाणच्या जवळपास दीडशे रोहित्रांची दुरुस्ती बाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आधीच दुष्काळी परिस्थिती असून प्रत्येक गावात चार-दोन शेतकऱ्यांकडे मात्र सिंचनाची सोय आहे. इतर शेतकरी बिल भरत नसल्याने या शेतकºयांचीही गोची होत असल्याने लोकप्रतिनिधींकडे खेटे मारून हे शेतकरी हैराण असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी व गावठाणच्या जवळपास दीडशे रोहित्रांची दुरुस्ती बाकी आहे.हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजचोरी, रोहित्रावरील अधिक भार आदी कारणांमुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. कधी आॅईलचा तुटवडा तर कधी दुरुस्ती करणारी यंत्रणाच काम बंद करीत असल्याने शेतकºयांना रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळत नाही. त्यातही आता महावितरणने थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी त्या रोहित्रावरील १00 टक्के वसुलीशिवाय रोहित्र न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशांची वेगळी प्रतीक्षा यादी तयार केली आहे. ही यादी आटोपल्यावर इतरांना रोहित्र मिळत आहे.या यादीतीलच सर्व गावांना रोहित्र मिळत नसल्याने इतर याद्यांचा विचारही होत नसल्याने अनेक गावांत महिन्यापासून अंधाराचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. काही गावात तर मोजक्याच शेतकºयांच्या शेतातील जलस्त्रोताला पाणी आहे. त्यामुळे इतर शेतकरी बिल भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा शेतकºयांना इतरांमुळे रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याचे चित्र आहे. हे शेतकरी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडे खेटे मारत आहेत. यावर कोणताच तोडगाही निघत नसल्याने नाहक वेळ दवडावा लागत आहे. इतरांची वीजजोडणी तोडून आम्हाला रोहित्र द्या, अशी मागणीही होत आहे. मात्र महावितरणला ते सोयीस्कर वाटत नाही.हिंगोली जिल्ह्यात सर्व थकबाकी भरूनही दुरुस्त न झालेले १00 एचपीचे २४, अपूर्ण थकबाकी भरलेले ७ तर कोणतीच थकबाकी न भरलेले ३0 रोहित्र आहेत. ६३ एचपीमध्ये पूर्ण थकबाकी भरलेले ३७, अर्धवट रक्कम भरलेले ८ तर काहीच न भरलेले २५ रोहित्र दुरुस्तीविना पडून आहेत. सिंगल फेजचे पूर्ण थकबाकी भरलेले १0 तर अर्धवट थकबाकी भरलेले ५ रोहित्र दुरुस्तीचे बाकी आहेत. महावितरणने आता प्रतीक्षा यादीनुसारच वाटपाचे नियोजन केल्याने पुढाºयांनाही काही वाव उरला नाही. त्यामुळे शेतकºयांना आता जावे तरी कुणाकडे ? असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण