शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

बारावीचा निकाल ८६.४0 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:04 IST

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी ४७१३ जणांनी नोंदणी केली होती. तर ४६९८ जांनी परीक्षा दिली. यापैकी ४४७१ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९५.१७ टक्के आहे. यात २७३ विशेष प्राविण्यात व २0३३ प्रथम श्रेणीत आहेत. बारावी कला शाखेसाठी ६३२९ नोंदणी केलेल्यांपैकी ६३0७ जणांनी परीक्षा दिली.यातील ४९९४ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ७९.१८ टक्के आहे. यात ४६६ विशेष प्राविण्यात तर २५२९ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेत नोंदणी केलेल्या ८३0 पैकी ८२८ जणांनी परीक्षा दिली. ७७५ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९३.६0 टक्के आहे. यात १४८ विशेष प्राविण्यात तर ३९२ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे ३१९ पैकी २९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८१.१९ टक्के असून यात ११ विशेष प्राविण्यात तर १५५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पुरवणी परीक्षेलाही हिंगोली जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून ५६२ विद्यार्थी होते.यापैकी १६२ उत्तीर्ण झाले. निकाल २८.८३ टक्के लागला आहे. यात प्रथम श्रेणीत ३१ जण उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८९८ एवढी असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले ५१0९ एवढे विद्यार्थी आहेत.द्वितीय श्रेणीत ४३४३ विद्यार्थी असून काठावर उत्तीर्ण होणारे अवघे १४९ जण आहेत. यंदा काठावर उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का घसरला आहे. तर द्वितीय व प्रथम श्रेणीत ही मुले गेल्याने यात टक्का वाढला आहे.हे वाढत्या गुणवत्तेचे लक्षण असले तरीही विशेष प्राविण्यात येणाºयांची संख्या त्या तुलनेत वाढत नसल्याचे दिसून येत आहे.तालुकानिहाय तुलना केल्यास हिंगोली तालुक्याचा सर्वाधिक ८८.३२ टक्के निकाल लागला. त्यानंतर कळमनुरी ८७.८८, सेनगाव-८७.८६, वसमत-८४.८२ व औंढा नागनाथ ८३.७५ अशी स्थिती आहे. हिंगोली तालुक्यात परीक्षा दिलेल्या १७0८ पैकी १४५७ मुले व ११५२ पैकी १0६९ मुली उत्तीर्ण झाल्या.कळमनुरीत १५२४ पैकी १२८४ मुले व १0३४ पैकी ९६४ मुली, वसमतला २१४९ पैकी १७४४ मुले व १६0२ पैकी १४१५ मुली, सेनगावात १0२७ पैकी ८९१ मुले तर ६२१ पैकी ५५७ मुली, औंढ्यात ७७१ पैकी ६२६ मुले तर ५६४ पैकी ४९२ मुली उत्त्तीर्ण झाल्या.यंदाही हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. यात ७२0१ पैकी ६00२ मुले तर ४९९0 पैकी ४४९७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुले ८३.६0 तर मुली ९0.४३ टक्के उत्तीर्ण झाल्या.तीन शाळांचा १00 टक्के निकालजिल्ह्यातील तीन शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. यात उच्च माध्यमिक शाळा ढोलक्याची वाडीचा विज्ञान व कला शाखेचा १00 टक्के, सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय हट्टा कला शाखा १00 टक्के व संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कापडसिंग कला शाखा १00 टक्के निकाल यांचा समावेश आहे. याशिवाय काही शाळांमध्ये एखाद्या किंवा दोन शाखांचा १00 टक्के निकाल लागला, छत्रपती शाहू महाराज उच्च माध्यमिक शाळा आडगाव विज्ञानचा १00 टक्के, केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय चुंचा विज्ञान १00 टक्के, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत वाणिज्य १00 टक्के, मॉडर्न उच्च माध्यमिक शाळा वसमत विज्ञान १00 टक्के, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वसमत विज्ञान १00 टक्के, सवित्रीबाई फुले कनिष्ट महाविद्यालय वाणिज्य १00 टक्के,श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय गुगुळ पिंप्री विज्ञान १00 टक्के, आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान १00 टक्के, मानकेश्वर कनिष्ठ महाविद्यालय पानकनेरगाव विज्ञान १00 टक्के लागला आहे. मात्र याच शाळा, महाविद्यालयांत बारावीच्या इतर शाखांच्या निकालाचे प्रमाण कमी असल्याने एकंदर निकाल १00 टक्के लागू शकला नाही. विशेषत: विज्ञान शाखेचा निकाल सगळीकडेच चांगला दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक